आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Security Forces Killed Three Terrorists In Pulwama, Seven Terrorists KilledJammu And Kashmir Pulwama Zadoora Area Encounter Updates 29 August In Two Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीरात एनकाउंटर:पुलवामात लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद; 24 तासांत एकूणच 7 दहशतवाद्यांचा झाला खात्मा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी जिवंत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून मिळालेल्या माहितीवर कारवाई

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सुरक्षा दलाने शनिवारी भल्या पहाटे 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या कारवाईमध्ये लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नसून सविस्तर तपास सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या परिसरात अजुनही काही दहशतवादी दबा धरून बसल्याची भीती आहे. त्यामुळे, संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

शुक्रवारी 4 तर शनिवारी 3 दहशतवाद्यांचा खात्मा

तत्पूर्वी शुक्रवारी दुपारी सुरक्षा दलाने शोपिया येथे 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. तसेच एकाला अटक सुद्धा करण्यात आली. गेल्या 24 तासांत एकूणच 7 दहशतवादी मारले गेले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, शोपियांमध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याची कसून चौकशी केली असता पुलवामा येथील दहशतवाद्यांचा पत्ता लागला होता. त्याच माहितीच्या आधारे शुक्रवारी रात्री उशीरा पुलवामाच्या जदूरा परिसरात शोध मोहिम सुरू करण्यात आली होती. याच दरम्यान, अचानक सुरक्षा दलावर गोळ्या झाडण्यात आल्या. परिणामी जवानांनी चोख प्रत्युत्तर देत 3 दहशतवाद्यांना ठार मारले आहे.