आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Security Forces Killed Two Terrorists Encounter Dunmar Area Srinagar Jammu Kashmir; News And Live Updates

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक:श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाने लष्करच्या 2 दहशतवाद्यांचा केला खात्मा, जम्मूतील सैन्य भागात पुन्हा दिसले ड्रोन

श्रीनगर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरक्षा दलाने बुधवारी तीन दहशतवाद्यांना ठार केले होते

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या दानमार भागात शुक्रवारी सुरक्षा दलाने लष्करच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या दहशतवाद्यांची ओळख पटली असून एकाचे नाव इरफान आणि दुसऱ्याचे नाव बिलाल अहमद आहे. हे दोघेही दहशतवादी पाकिस्थानातील दहशतवादी संघटन लष्कर-ए-तोयबाशी संबंधित आहे. दरम्यान, दहशतवाद्यांकडून एके 47 रायफल आणि 4 ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे. हे दोन्ही दहशतवादी स्थानिक असल्याचे काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले आहे.

या चकमकीत सुरक्षा दलाचे 2 जवानदेखील जखमी झाले आहे. पोलिस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाव्दारे ही शोधमोहीम राबवण्यात आली होती. एका पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सफाकदल-सौरा रस्त्यालगत दानमार भागात काही दहशतवादी लपून बसल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाकडून संबंधित भागाला घेराव घालण्यात आला आणि सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक निर्माण झाली. प्रत्युत्तरात सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना ठार केले.

सुरक्षा दलाने बुधवारी तीन दहशतवाद्यांना ठार केले होते
यापूर्वी सुरक्षा दलाने म्हणजे बुधवारी पुलवामामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. यामध्ये पाकिस्तानी लष्कर कमांडर एजाज उर्फ अबु हुरैराचा समावेश होता. ठार झालेले इतर दोन दहशतवादी स्थानिक होते. लष्कर कमांडर हुरैरा हा श्रीनगर आणि पुलवामा भागात सक्रिय असल्याचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...