आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Security Forces Shot Down Pakistani Drones In Kashmir; Five Kilos Of Explosives Seized

जम्मू:सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये पाकिस्तानी ड्रोन पाडले; पाच किलो स्फोटके जप्त, मोठा कट उधळला

जम्मू3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी मोठ्या ड्रोन हल्ल्याचा कट उधळून लावला. सुरक्षा दलांनी गुरुवारी मध्यरात्री जम्मू जिल्ह्यातील सीमावर्ती भागात अखनूरमधील कानाचकमध्ये पाकिस्तानी ड्रोन पाडले. ड्रोनमधील पाच किलो स्फोटके (आयईडी) जप्त करण्यात आली आहेत.

ड्रोनची लांबी ६ फूट आणि वजन १७ किलो आहे. ते आंतरराष्ट्रीय सीमेवरून आठ किलोमीटर आत घुसले होते. त्याची माहिती मिळताच पोलिसांच्या त्वरित प्रतिसाद दलाने (क्यूआरटी) ड्रोनरोधी रणनीतीचा वापर करत ते मध्यरात्री एक वाजता खाली पाडले. स्फोटके खाली टाकण्यासाठी ड्रोन कमी उंचीवर उड्डाण करत होते.

दोन दहशतवादी ठार
बारामुल्ला जिल्ह्याच्या सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरसहित दोन दहशतवाद्यांना ठार केले. वारपोरा येथील फय्याज अहमद वार आणि चेरपोरा बडगाम येथील शाहीन अहमद ऊर्फ शाहीन मौलवी अशी त्यांची नावे आहेत. फय्याज ‘लष्कर’चा स्थानिक कमांडर होता. तो अनेक हल्ल्यांत आणि हत्यांत सहभागी होता.

बातम्या आणखी आहेत...