आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेन्नईच्या मामल्लापुरममध्ये सुरू ४४ व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये पॅलेस्टाईनहून आलेली ८ वर्षीय रँडा सेदार सर्वात कमी वयाची खेळाडू आहे. आपल्या वयोगटात ती जगात दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू आहे. लहान वय आणि साधेपणामुळे ती स्पर्धे सेलिब्रिटी झाली आहे. विविध देशांतील बुद्धबळाचे खेळाडू तिची भेट घेऊन सेल्फी काढत आहेत. स्पर्धेत लोकप्रियता लाभल्याने रँडा सेदार खूप खुश आहे. मात्र, आपल्या मातृभाषेशिवाय अन्य भाषा येत नसल्यामुळे ती लोकांशी बोलू शकत नाही. यात सहकारी खेळाडू तिच्या मदतीला येतात. भारतात सेदारला भातासोबत चिकन टिक्का मसाला खूप आवडतो.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ३० जुलैला रँडाने कोमोरेसच्या फाहिमा अलीला ३९ चालींत मात दिली. रँडा वयाने लहान असली तरी तिच्या चाली बड्या खेळाडूंनाही समजत नाहीत. ती एवढी लहान आहे की टेबलवर ठेवलेल्या चेस बोर्डपर्यंत तिचा हात पोहोचत नाही. त्यामुळे ती खुर्चीवर गुडघ्यावर बसून खेळते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही तिची भेट घेतली. रँडाचे वडीलच तिचे प्रशिक्षक आहेत. तिचा भाऊ मोहंमद वयाच्या १३ व्या वर्षी एफआयडीई मास्टर ठरला होता. तिने सर्व चाली भावाकडून आत्मसात केल्या आहेत. या स्पर्धेत १८५ देशांचे खेळाडू सहभागी आहेत. स्पर्धेची सांगता ९ ऑगस्टला होईल. पॅलेस्टाइनचा महिला चमू प्रथमच चेस ऑलिम्पियाडमध्ये भाग घेत आहे. रँडाशियाय या चमूतील १६ वर्षीय तक्वा हमौरी, सारा अल्हमौरी आणि १५ वर्षीय एमान सावन प्रथमच चेस ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झाल्या आहेत. भारतात फिरण्याची त्यांची इच्छा आहे.
पॅलेस्टाईनच्या खेळाडूंना स्पर्धेत भाग घेणे सोपे काम नाही बुद्धीबळपटू हमौरी म्हणाली, युद्धग्रस्त पॅलेस्टाईनमधून चेस ऑलिम्पियाडमध्ये भाग घेण्यासाठी येणे सोपे नव्हते. आम्हाला जॉर्डनहून बहरीनमार्गे भारतात यावे लागले. त्यांनी सांगितले की,पॅलेस्टाईनमध्ये जास्त स्पर्धा होत नाही. मात्र, आगामी काळात आम्ही चांगले दिवस पाहू,अशी आशा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.