आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Seeing The Readiness Of The Indian Army On The Kailash Range, China Started Withdrawing

10 महिन्यांनंतर लडाखमध्ये शांततेचे शुभसंकेत:कैलाश रेंजवर भारतीय लष्कराची सज्जता पाहून चीनची माघार सुरू

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही बाजूंचे मिळून सुमारे ५० हजार सैनिक आमनेसामने

भास्कर एक्स्पर्ट जन. व्ही. पी. मलिक, माजी लष्करप्रमुख

गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या कुरापतीनंतर दोन्ही बाजूंचे सुमारे ५० हजार सैनिक येथे तैनात आहेत. दोघांकडेही शस्त्रसज्जता असल्याने साधी घटनाही युद्धाचा भडका उडवू शकते. त्यामुळे चिनी लष्कराच्या माघारीचे स्वागतच करायला हवे.

अखेर १० महिन्यांनंतर पूर्व लडाख सीमेवर पेंगाँग सरोवराच्या दक्षिण व उत्तर किनाऱ्यावर भारत-चीनचे रणगाडे मागे येण्यास सुरुवात झाली आहे. लडाखमधून चिनी रणगाडे माघार घेत असल्याची अधिकृत घोषणा चिनी लष्कराने केली. इकडे, भारतीय लष्कराने याला पुष्टी दिली नसली तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शांततेच्या चर्चेला यश आल्याचे म्हटले. दोन्ही देशांत बराच काळ चर्चा सुरू होती. एलएसीवर तणाव कमी करण्याच्या दृष्टीने हे प्राथमिक पाऊलच आहे. कारण, लष्कराने टप्प्याटप्प्याने माघार घ्यायची म्हटले तरी ५ महिने लागतील. त्यानंतरच तणाव पूर्ण निवळला असे म्हणता येईल. ३० ऑगस्टनंतर कैलाश रेंजवर भारताने लष्कर तैनात केले. आधुनिक युद्धक वाहनेही नेली. नेमके हेच कारण चीनसाठी चिंतेचे ठरले. कारण, या भागात भारतीय लष्कर उंचीवर तळ ठोकून आहे. सर्वात शेवटी याच पॉइंटवरून लष्कर माघार घेईल हे नक्की. कारण, सध्या तरी रणगाडे मागे हटवण्यावर दोघांत सहमती झाली आहे. त्यानंतर इतर वाहने, लष्कराला पुरवठा करणारी वाहने व इतर साहित्य मागे घेतले जाईल. शेवटी सैनिक मागे येतील. यावर ड्रोन व हेलिकॉप्टरने निगराणी हाेईल. सर्वात शेवटी या भागात पायदळ नेमके किती आहे, याचा आढावा घेतला जाईल. हे करताना गलवानसारखी घटना होऊ नये ही काळजी घेतली जाईल. कारण तेव्हाही चिनी लष्कर माघार घेण्यास राजी झाले होते. परंतु, प्रत्यक्षात सैनिकांनी माघार घेतली नव्हती व तणाव वाढला होता.

(शब्दांकन : मुकेश कौशिक)

बातम्या आणखी आहेत...