आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Seeing The Stones Falling On The Road, They Began To Sweep; So That No One Falls

वाहतूक पोलिसाने केला रस्ता साफ:रस्त्यावर पडलेले दगड पाहून झाडू मारायला केली सुरुवात, लोकांनी केला सलाम

नवा दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऊन असो वा पाऊस, प्रत्येक मोसमात रस्त्याच्या मधोमध उभे राहून वाहतूक हाताळणे सोपे नसते. पण वाहतूक पोलिस हे काम नेहमी चोख पणे पार पडतात. सिग्नलवर थोडा वेळ थांबावे लागले तर कंटाळा येऊ लागतो, पण ट्रॅफिक पोलिस चेहऱ्यावर हसू आणून रस्ता मोकळा करतात. आज याच ट्रॅफिक पोलिसांबद्दल बोलत आहोत कारण एका ट्रॅफिक पोलिसाचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक वाहतूक पोलिस रस्ता झाडताना दिसत आहे.

ट्रॅफिक पोलिसाचे कौतुक

हा व्हिडिओ तामिळनाडूचा आहे. येथील सिग्नलवर तैनात असलेल्या एका पोलिसाला रस्त्यावर काही दगड पडलेले दिसले. रस्त्यावर पडलेले दगड त्यांनी बाजू केले जेणेकरुन या दगडांमुळे कोणताही अपघात होऊ नये. पोलिस कर्मचारी रस्ता साफ करताना पाहून वाहनांचा वेगही मंदावला. या कामाबद्दल लोकांनी त्यांचे खूप कौतुक केले. छत्तीसगड केडरचे आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर कौतुक

या पोलिस कर्मचाऱ्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे, एका युजरने लिहिले की, या जागत तुमच्या सारखे ट्रॅफिक पोलिस आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. तुमच्या माणूसकीला सलाम असे या युजरने म्हटले आहे. दुसर्‍या वापरकर्त्याने प्रशंसा केली परंतु सल्ला देखील दिला. त्यांनी लिहिले - चुकीचा माणूस योग्य काम करत आहे, त्याचे काम रस्ते स्वच्छ करणे नाही तर कायदा आणि सुव्यवस्था राखणे आहे.

वाहतूक पोलिसाने लोकांची मने जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाही. एप्रिल 2022 मध्ये कोलकाता येथून अशीच एक घटना समोर आली होती. येथे सिग्नलवर राहणाऱ्या मुलाला शिकवणी शिकवणाऱ्या वाहतूक पोलिसाचा फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो कोलकाता पोलिसांनी आपल्या फेसबुक पेजवर देखील शेअर केला आहे.

बातम्या आणखी आहेत...