आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यात ४ मेपासून आदिकैलास आणि ओम पर्वत यात्रेला सुरुवात होत आहे. भाविकांना प्रथमच तवाघाटहून आदिकैलास आणि ओम पर्वतपर्यंत वाहनाने जाता येईल. सीमा मार्ग संघटनेने (बीआरओ) सुमारे २० हजार फूट उंचीवर तयार केलेल्या १३० किलोमीटर लांबीच्या रस्त्यामुळे हे शक्य होणार आहे. यापूर्वी भाविकांना तवाघाट पॉइंटपासून पायी जावे लागत होते. या वेळी कुमाऊं मंडळ विकास पालिकेने (केेएमव्हीएन) भाविकांसाठी पॅकेजही तयार केले आहे. हे पॅकेज न घेताही भाविक यात्रेला जाऊ शकतात. त्यासाठी धारचूला उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून इनरलाइन परवाना घ्यावा लागेल.
याला भारताचे कैलास मानसरोवरही म्हणतात
आदिकैलासला भारताचे कैलास मानसरोवरही म्हटले जाते. चीनच्या कब्जातील तिबेटस्थित कैलास पर्वताचे प्रतिबिंब जसे मानसरोवर तलावात दिसते अगदी तसेच आदिकैलास पर्वताचे प्रतिबिंब पार्वती कुंडात दिसते. उत्तराखंडच्या सीमेवरील लिपुलेख दऱ्यांतील रस्त्यावरून कैलास मानसरोवर यात्रा सध्या बंद आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.