आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Seize Fire Violation : India Pakistan LoC| Five Pakistani Soldiers Killed On Line Of Control LoC In Jammu And Kashmir.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा वाढला तणाव:LoC वर पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार, भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचे 5 सैनिक ठार

जम्मूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • पाकिस्तानने यावर्षी आतापर्यंत 3200 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे

पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. गुरुवारी दुपारी सुरू झालेला गोळीबार शुक्रवारी सकाळपर्यंत होता. भारतीय लष्कराने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईत पाकिस्तानचे पाच सैनिक ठार झाले तर तीन जखमी झाले. वृत्तसंस्थेने भारतीय लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

पुंछ सेक्टर निशाणा

सूत्रांनुसार, गुरुवारी दुपारनंतर पाकिस्तानकडून सुरू झालेला गोळीबार शुक्रवारी पहाटेपर्यंत चालू होता. या दरम्यान मोठे शस्त्रे आणि मोर्टारचा देखील वापर करण्यात आला. भारतीय लष्कराने देखील याचे जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईत पाकिस्तानचे पाच सैनिक ठार झाले. एलओसीच्या काही भागात पाकिस्तानी सैनिक सतत उकसावण्याचे काम करत आहे. गुरुवारी रात्री जम्मू-काश्मीरचे पुंछ सेक्टर निशाण्यावर होते.

नागरिकांना लक्ष्य करण्याचे षड्यंत्र

भारतीय सैन्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानकडून अचानक गोळीबार सुरू झाला. त्यांना भारतीय नागरिकांना लक्ष्य करायचे आहे. मानकोट सेक्टरमध्ये सर्वाधिक गोळीबार झाला. येथील काही नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारच्या कृत्यांना प्रत्युत्तर देणे आवश्यक होते. आम्ही पाकिस्तानचे पाच सैनिक ठार केले तर तीन जखमी आहेत. त्यांनी अनेक नवीन बंकर बनवले आहेत. त्यांनाही उद्ध्वस्त केले आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास सुमारे 2 तास जोरदार गोळीबार झाला.

आतापर्यंत 3200 युद्धबंदीची उल्लंघन

1999 मध्ये युद्ध बंदीच्या उल्लंघनांबाबत दोन्ही देशांमध्ये करार झाला. पाकिस्तान या युद्धबंदी कराराचे सतत उल्लंघन करीत आहे. यावर्षी आतापर्यंत त्याने 3200 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. यात 30 नागरिक ठार आणि 100 हून अधिक जखमी झाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser