आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Seizure Of Remedicavir Corona To Be Issued To Patients, Court Orders Delhi Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:जप्त रेमडेसिविर कोरोना रुग्णांसाठी जारी करावे, कोर्टाचा दिल्ली सरकारला आदेश

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जप्त रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर कोरोना रुग्णांसाठी न केल्याबद्दल दिल्ली हायकोर्टाने गुरुवारी नाराजी व्यक्त केली. हायकोर्टाने जप्त रेमडेसिविर रुग्णांसाठी तत्काळ जारी करण्याचा आदेश दिल्ली सरकारच्या महसूल विभागाला दिला. पोलिसांनी ही औषधे साठेबाज व काळाबाजार करणाऱ्यांकडून जप्त केली होती.

जप्त मेडिकल ऑक्सिजन सिलिंडर्सबाबतही कोर्टाने याच प्रकारचा आदेश दिला. कोर्ट म्हणाले, त्यांचा वापरही रुग्णांसाठी केला जावा. न्यायाधीश विपिन सांघी आणि रेखा पल्ली यांच्या पीठाने रेमडेसिविर आणि ऑक्सिजन सिलिंडरबाबत याचिकांवर एकत्रित सुनावणी केली. कोर्ट म्हणाले, “जप्त औषधे एखाद्याच्या मालमत्तेचे प्रकरण नाही. औषधे जप्त केल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्यावी. ही औषधे खरी आहे की नाही, याचाही तपास करावा. अशी औषधे फ्रीजमध्ये ठेवली जावीत.’

ऑक्सिजन देण्यात केंद्राचा भेदभाव : दिल्ली सरकार
उच्च न्यायालयात गुरुवारी दिल्ली सरकारकडून वरिष्ठ वकील राहुल मेहरा यांनी सांगितले की, केंद्र सरकार ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये भेदभाव करत आहे. इतर राज्यांना त्यांच्या मागणीनुसार जास्त ऑक्सिजन सिलिंडर्स दिली जात आहेत. मात्र दिल्लीला कमी पुरवठा केला जात आहे. यावर कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस जारी करून शपथपत्र दाखल करण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...