आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिमाचल:उत्पन्नाचे एकमेव साधन असलेली गाय विकून ऑनलाइन क्लासेससाठी 6 हजारांत गाय विकून घेतला स्मार्टफोन

कांगडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसरी व चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांना फोनअभावी अभ्यासात अडथळे

जागतिक महामारी कोविड-१९ च्या संसर्गाचा धोका पाहता देशभरातील शाळा बंद आहेत. बहुतांश मुलांना ऑनलाइन क्लासेसद्वारे शिकवले जात आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशातील एका व्यक्तीने कुटुंबासाठी एकमेव उत्पन्नाचे स्रोत असलेली गाय विकली. कारण त्याला दोन मुलाचे आॅनलाइन शिक्षण करण्यासाठी मोबाइलची गरज होती. त्याने गाय विकून मुलांसाठी स्मार्टफोन विकत घेतला. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील ज्वालामुखी येथे राहणाऱ्या कुलदीपकुमार यांनी सांगितले, लॉकडाऊन काळात मार्च महिन्यापासून शाळा बंद झाल्या. परंतु मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. माझी मुले दुसऱ्या व चौथ्या वर्गात शिकतात. त्यांच्याकडे स्मार्टफोन नसल्याने मुलांना अभ्यास करता येत नव्हता. त्यांच्यावर अभ्यासाचा दबाव वाढत होता. यामुळे सहा हजार रुपयात गाय विकली व स्मार्ट फोन विकत घेतला. मुलांना शिकायचे असेल तर त्यांच्याकडे स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. त्यामुळे नाइलाजाने मला गाय विकून स्मार्टफोन घ्यावा लागला.

आर्थिक स्थिती चांगली नसल्याने बँकेने ६ हजार रुपयांचे कर्जही दिले नाही
कुलदीप म्हणाला, स्मार्टफोन विकत घेण्याची ऐपत नव्हती. कर्ज घेण्यासाठी बँकेत गेलो. परंतु आर्थिक परिस्थिती वाईट असल्याने कर्ज मिळू शकले नाही. शेवटी नाइलाजाने गाय विकावी लागली. गाय आमच्या उत्पन्नाचे एकमेव साधन होती. कुलदीप व त्याची बायको- मुले एका साध्या झोपडीत राहतात. माझ्याकडे बीपीएल कार्डही नाही. आर्थिक अडचणीचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी अनेकदा पंचायतीत गेलो होतो. परंतु कोणी मदत केली नाही.