आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांतील पैसे शेअर मार्केटमध्ये:इन्कम टॅक्स भरण्यात ज्येष्ठ नागरिक सर्वात आघाडीवर

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ नागरिकांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एक लाख कोटी रु. पेक्षाही अधिक आयकर भरला आहे. तो मागील वेळेपेक्षा ३५.५% अधिक आहे. २०२१-२२ मध्ये ज्येष्ठ नागरिकांकडील कर संकलनात ५% वाढ झाली होती. २०१९-२० म्हणजे कोरोनापूर्व वर्षांशी तुलना केल्यास या वेळी ज्येष्ठ नागरिकांचे कर संकलनातील योगदान ६१% पेक्षा अधिक आहे. २०२२-२३ आयकर संकलन १७ % अधिक होते. १६.६१ लाख कोटी रुपयांच्या निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात वैयक्तिक करदात्यांचा वाटा २४% आहे.

नांजिया अँडरसनचे अरविंद श्रीनिवासन म्हणतात की, २०२० नंतरच्या लाभांश करातील बदलांमुळे अनेक गुंतवणूकदारांनी या वर्षी कर भरला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या काही वर्षांत एफडीवरील परतावा खूपच कमी होता. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी बँकांतून पैसे काढून ते शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात लावले. कोविड-१९ मुळे शेअर्सचे मूल्य खूपच कमी असताना हे पैसे गुंतवले गेले. नंतर शेअर बाजारात तेजी आली. ज्या गुंतवणूकदारांनी जास्त किमतींवर नफा मिळवला त्यांच्याकडून भांडवली नफा कर जमा करण्यात आला. त्याचा परिणाम करवसुलीवरही दिसून आला. २०२२-२३ या आर्थिक वर्षात करदात्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या ७३.१ लाखांवरून १८.६% ने वाढून ८६.७१ लाख झाली आहे.

कारण : पेन्शनचे जास्त एरियर्स, नियमांत बदल प्राइस वॉटरहाऊस कूपर्सचे कुलदीप कुमार म्हणतात, ज्येष्ठांनी जास्त आयकर भरण्याची अनेक कारणे आहेत. सेवानिवृत्त सैनिकांना ५७ हजार कोटी रुपये एिरयर्स मिळाला.