आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Senior IAS Woman Officer Said There Is An End To This Demand, Detention Will Also Have To Be Given For Free, Latest News And Update News 

मग निरोधही फ्री द्यावे लागतील:विद्यार्थीनीने विचारले- सॅनिटरी पॅड फ्री देऊ शकत नाही का; तर महिला IAS अधिकाऱ्याने केले बेताल वक्तव्य

पाटना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलींच्या जनजागृतीसाठी पाटणा येथे आयोजित कार्यशाळेत एका मुलीने तेथे उपस्थित असलेल्या एका महिला आएएस अधिकाऱ्यांना प्रश्न केला. विद्यार्थीनी म्हणाली- सरकार 20 ते 30 रुपयांत सॅनिटरी पॅड देऊ शकत नाही का? या प्रश्नावर उत्तर देताना वरिष्ठ महिला आयएएस अधिकारी म्हणाल्या की, या मागणीला अंत नाही. तुम्ही 20 ते 30 रुपयांचे सॅनिटरी पॅड घेऊ शकता. जीन्स पॅन्ट देऊ शकता का? तर त्यापुढे जाऊन तुम्ही सुंदर शूज का देऊ शकत नाही? असा प्रश्न केला जाऊ शकतो. या मागण्यांना अंतच नाही.

IAS अधिकारी हरजोत कौर बमरा एवढ्याच उत्तरावर थांबल्या नाहीत. मुलांच्या सशक्तीकरण कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थीनींना उत्तर देताना सांगितले की, उद्या जेव्हा कुटुंब नियोजनाचा प्रश्न येईल. तेव्हा मोफत निरोध देण्याची मागणी केली जाईल. असे बेताल वक्तव्य केल्याने या अधिकारी महिलेचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

यनिसेफ, सेव्ह द चिल्ड्रन अ‌ॅंड प्लॅन इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने, मंगळवारी महिला व बालविकास महांडळातर्फे पाटना शहरात 'सशक्त बेटी, समृद्ध बिहार: टुवर्ड्स एन्हांसिंग द व्हॅल्यू ऑफ गर्ल चाइल्ड' या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

लैंगिक असमानता दूर करण्यासाठी सरकारी योजनांची मुलींना जाणीव करून देणे हा त्यामागचा उद्देश होता. पण जेव्हा मुलींनी महिला आणि बाल विकास महामंडळाच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालक हरजोत कौर बमरा यांना योजनांविषयी प्रश्न विचारला. तेव्हा त्यांना महिला अधिकाऱ्याने मुलींना विचित्र उत्तरे देऊन कार्यक्रमात सर्वांनाचस थक्क करून सोडले.

'सशक्त बेटी, समृद्ध बिहार या मुलींच्या सशक्तीकरणाच्या कार्यक्रमात उपस्थित महिला अधिकारी व अन्य पदाधिकारी.
'सशक्त बेटी, समृद्ध बिहार या मुलींच्या सशक्तीकरणाच्या कार्यक्रमात उपस्थित महिला अधिकारी व अन्य पदाधिकारी.

महिला विकास महामंडळाचे एमडी काय म्हणाल्या कार्यशाळेत आलेल्या नववी-दहावीच्या विद्यार्थीनींना

प्रश्न : मी मिलर शाळेतील विद्यार्थीनी आहे. शाळेचे स्वच्छतागृह तुटलेले आहे. अनेकदा मुलेही प्रवेश करतात. शौचालयास जावे लागते म्हणून कमी पाणी पिते?

हरजोत कौर: बरं मला सांगा, तुमच्या घरात स्वतंत्र शौचालय आहे का, वेगवेगळ्या ठिकाणी खूप काही मागितलं तर कसं चालेल?

प्रश्न : नाही मॅडम, जे सरकारच्या हातात आहे, ते तरी द्यायला हवे की नाही ?

हरजोत कौर: सरकारकडून घेण्याची गरज का आहे? हा विचार चुकीचा आहे. स्वतः काहीतरी करा.

प्रश्न : मी प्रिया कमला नेहरू नगर येथून आले आहे. सरकार सर्व काही देते. शाळेत 20-30 रुपयांचे सॅनिटरी पॅड परवडत नाही?

हरजोत कौर : बरं जे टाळ्या वाजवत आहेत. त्यांना मी सांगू इच्छिते की, या मागण्यांचा कोणताच अंत नाही. सॅनिटरी पॅड 20-30 रुपयांना मिळू शकतात. उद्या जीन्स पँट फ्री द्या. परवा तुम्ही सुंदर शूज का देऊ शकत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जाईल. शेवटी जेव्हा कुटुंब नियोजनाचा प्रश्न येईल, तेव्हा निरोध देखील विनामूल्य द्यावे लागतील. ​​​​​​​

प्रश्न : सरकारने पैसे द्यावे कारण ते आमच्याकडून मते घ्यायला येतात.

हरजोत कौर: मूर्खपणा वाट पाहत आहे. मतदान करू नका. पाकिस्तानात जा तुम्ही पैशासाठी मत देता का, सुविधांच्या बदल्यात सांगा !

विद्यार्थी : मी हिंदुस्थानी आहे मग मी पाकिस्तानात का जाऊ?

कदाचित- एमडीला हे मुलींना समजावून सांगायचे होते

हरजोत कौर : मुलींनो तुमची विचारसरणी बदलावी लागेल. तुम्हाला भविष्यात स्वतःला कुठे बघायचे आहे हे ठरवायचे आहे. हा निर्णय तुम्हाला स्वतःला घ्यावा लागेल. सरकार तुमच्यासाठी हे काम करू शकत नाही. तू जिथे आहे किंवा मी ज्या बाजूला बसलो आहे. तिथे तुला बसायचे आहे.

अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही

आम्ही महिला आणि बाल विकास महामंडळाच्या अध्यक्षा सह व्यवस्थापकीय संचालक हरजोत कौर बमरा यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. कार्यक्रमातील संभाषणातील व्हिडिओ मात्र, आमच्याकडे आहे

बातम्या आणखी आहेत...