आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्येष्ठ पत्रकार-संपादक डाॅ. वेदप्रताप वैदिक (७८) यांचे मंगळवारी निधन झाले. गुरुग्राम येथील घरात ते बाथरूममध्ये घसरून पडले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. त्यांच्या पश्चात मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर बुधवारी दिल्लीतील लाेधी विश्रामघाट येथे सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार हाेतील. वेदप्रताप वैदिक प्रेस ट्रस्ट आॅफ इंडियाची हिंदी वृत्तसंस्था ‘भाषा’च्या संस्थापक-संपादकरूपाने परिचित हाेते. भारतीय भाषा संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपदही भूषवले हाेते. ३० डिसेंबर १९४४ राेजी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये जन्मलेल्या वैदिक यांनी आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयात जेएनयूमधून पीएचडीदेखील केली हाेती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.