आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स:डिसेंबरपर्यंत 12% उच्चांक गाठेल सेन्सेक्स

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०२२ च्या अखेरीस, स्टॉक मार्केटमध्ये सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे १२% वाढण्याची अपेक्षा आहे. ही तेजी देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच अमेरिकन बाजारातही येईल. विश्लेषकांच्या मते विदेशी गुंतवणूकदारांचा परतावा आणि महागाई कमी झाल्याचा फायदा भारतीय बाजाराला होईल.जेपी मॉर्गन चेंजचे मार्को कोलानोविक म्हणाले, डिसेंबरच्या शेवटी अमेरिकेत १२ टक्के तेजी शक्य आहे. आर्थिक सेवा देणाऱ्या अमेरिकी कंपनीच्या मते, वर्षाच्या शेवटपर्यंत अमेरिकी इक्विटी निधीत १०० अब्ज डॉलरची गुुंतवणूक होईल. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले, विदेशी गुंतवणूकदारांनी नऊ महिने विक्री केल्यानंतर जुलैपासून भारतीय बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी ते पैसे काढतील, असे वाटत नाही. अमेरिकी बाजारात तेजी राहिली तर याचा परिणाम भारतावर दिसून येईल.

नफा वसुली थांबली, सेन्सेक्स ६५२ अंकांनी घसरला देशांतर्गत शेअर बाजारातील तेजी शुक्रवारी थांबली. सेन्सेक्स ६५२ अंकांनी घसरून ५९,६४६ वर बंद झाला. निफ्टीही १९८ अंकांनी घसरून १७,७५८ च्या पातळीवर पोहोचला. सेन्सेक्समध्ये पाच दिवस आणि निफ्टीमध्ये आठ दिवसांच्या वाढीनंतर घसरण दिसून आली. विश्लेषकांच्या मते, कमकुवत जागतिक ट्रेंडमध्ये नफावसुलीमुळे देशांतर्गत इक्विटी मार्केटवर भार पडला.

पोर्टफोलिअो संतुलित करण्याची योग्य वेळ ^१७जूनच्या पातळीपासून निफ्टी १६% वर आहे. आता पोर्टफोलिओ संतुलित करण्याची वेळ आली . गुंतवणूकदारांनी आता सावधगिरीने त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये संतुलन राखले पाहिजे. -विनोद नायर, रिसर्च हेड, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस

बातम्या आणखी आहेत...