आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनामुळे बेहाल केरळमध्ये निपाह विषाणू पसरला आहे. कोझिकोडमध्ये १२ वर्षीय मुलाचा निपाहच्या संसर्गाने मृत्यू झाल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट झाली. त्यानंतर राज्यात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आरोग्य कर्मचारी मृताच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. आतापर्यंत २५१ जणांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. ११ लोकांमध्ये लक्षणे आढळून आली आहेत.
कोझिकोडमधील मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या संपर्कातील लोकांची विलगीकरणात रवानगी केली जात आहे. फळ खाल्ल्याने वटवाघळात आढळून येणारा विषाणू केरळमध्ये पसरण्याची ही चार वर्षांतील तिसरी वेळ आहे. या पूर्वी २०१९ मध्ये असा संसर्ग दिसून आला होता.
कोझिकोडमध्ये राज्याचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज म्हणाले, मृताच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या तपासणीचा अहवाल मिळाला अाहे. मृताच्या नातेवाइकांसह १० जणांचे अहवाल निगेटिव्ह आढळले आहेत. हा आपल्यासाठी दिलासा आहे. संशयितांची तपासणी कोझिकोड मेडिकल कॉलेज स्पीटलमध्ये पुण्याच्या नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांच्या निगराणीखाली केली जात आहे.
निपाहवर प्रतिबंधात्मक आैषध नाही, फळ धुऊन खावे, पीडिताचे अवयव निकामी हाेण्याचा धोका
निपाह काय आहे, कसा पसरतो?
निपाह एक विषाणू आहे. फळ आहार असलेल्या वाटवाघळांमध्ये तो आढळतो. त्याने खाल्लेल्या फळातून विषाणू मानवी शरीरात जातो. त्यापासून धोका निर्माण होतो. विषाणूचा संसर्ग एका माणसाकडून दुसऱ्यास होण्याची भीती असते. त्यातही आरोग्य कर्मचाऱ्यांना जास्त भीती आहे. कारण ते रुग्णाच्या संपर्कात असतात.
लक्षणे काय ? बचाव कसा करावा?
ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास इत्यादी प्रमुख लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यावर १० ते १२ दिवसांत शरीरातील विविध अवयवांवर त्याचा परिणाम दिसतो. बचावासाठी जागरुकता महत्त्वाची ठरते. फळे धुऊन खावी. निपाहवर घरी उपचार शक्य नाही.
निपाह किती जोखमीचा आहे.
निपाह अतिशय जोखमीचा आजार आहे. कारण त्यापासून बचावासाठी अजूनपर्यंत लस बनलेली नाही. बाधितावर लक्षणे पाहून सुरुवातीच्या टप्प्यात उपचार झाले नाहीतर शरीराचे बहुतांश अवयव निकामी होऊ लागतात. चोवीस तासांत पीडित कोमात जातो.
कोणत्या भौगोलिक क्षेत्रात पसरतो?
सामान्यपणे वन्य क्षेत्रातील रहिवासी भागात पसरण्याचा धोका असतो. आतापर्यंत भारतात पश्चिम बंगाल, केरळमध्ये रुग्ण आढळतात. हवामानाचा निपाह विषाणूशी संबंध नाही.
कोरोना बाधितालाही निपाह होऊ शकतो का?
होय. कोरोना बाधिताला देखील निपाह संसर्ग होऊ शकतो. हा काेरोनाहून मोठा धोका आहे. कारण कोविड-१९ चा मृत्युदर १-२ टक्के आहे. निपाह विषाणू संसर्गात मृत्युदर ४० ते ८० टक्क्यापर्यंत आहे. म्हणूनच जास्त चिंता वाटते.
कोरोनासारखा संसर्गजन्य आहे?
निपाह देखील तसाच आहे. परंतु वेगाने पसरत नाही. एचआयव्ही एड्ससारखा आहे. शरीरारातील द्रव, रक्त इतर सामान्य व्यक्तीमध्ये प्रवेश केल्यास तो आजारी पडू शकतो.
बाधित झाल्याचे कसे समजते?
विषाणूच्या तपासणीसाठी आरटीपीसीआरचा वापर केला जातो. उपचारासाठी सुरुवातीला गळा, नाक, मूत्र व रक्ताची तपासणी केली जाते. दोन आठवड्यांनंतर अँटीबॉडीचाही शोध घेतला जाऊ शकतो.
देशात उपचाराची तयारी कशी आहे?
केंद्राची एनसीडीसीची निगराणी टीम केरळला पाठवण्यात आली आहे. त्यात पशुपालन विभागातील लोकांना विशेष प्रजातीच्या वटवाघळाचा शोध घ्यावा लागेल. त्यामुळे त्याच्या अधिवासाला पुढे येण्यापासून रोखता येऊ शकेल. राज्याला तंत्रज्ञानाच्या पातळीवर तपासणीसाठी प्रयोगशाळा उपलब्ध करून दिली जाते. राज्याला दिशानिर्देश जारी करावे लागतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.