आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाब विधानसभा निवडणुकीतील मानहाणीकारक पराभवानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्याविषयी केलेल्या एका विधानाने मोठी खळबळ माजली आहे. जाखड यांनी एका मुलाखतीत चन्नी यांच्यावर 'मीटू'चे (Me Too) गंभीर आरोप केले. माजी मुख्यंमत्री चरणजितसिंग चन्नी यांच्या विरोधात यापूर्वी एका आयएएस अधिकाऱ्याने मीटूची तक्रार केली होती. त्यानंतर आता एका महिला पत्रकारानेही अशी तक्रार केली आहे. मी पूर्ण जबाबदारीने हा आरोप करत आहे, असे जाखड म्हणाले. समाजात उजळ माथ्याने फिरणे लज्जास्पद असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
जाखड म्हणाले, महिला पत्रकाराने वस्तुस्थिती सांगितली तरी पंजाबच्या मुलींवर फार मोठे उपकार होतील. मी त्यांचे नाव ओढणार नाही. पण, चन्नी यांनी जे केले, ते पक्ष व समाजासाठी अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. या प्रकरणी चन्नी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
मी चन्नी यांना लीडर मानत नाही
सुनील जाखड म्हणाले, काँग्रेसने चरणजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्री केले. त्यानंतर ४-५ दिवसांनी माझी भेट झाली असता मला सरकारमध्ये काम करण्यास सांगण्यात आले. त्यावेळी मी चन्नींना लीडर मानत नसल्याचे ठामपणे सांगितले. तसेच पक्षासोबत कायम काम करण्याची इच्छाही व्यक्त केली. मी चन्नी यांना चांगल्या प्रकारे ओळखतो. ते त्यांच्या कोणत्याच कसोटीवर खरे उतर नाहीत, असे ते म्हणाले.
अनेकदा वादात अडकले चन्नी
टॉस करुन पोस्टिंग- चरणजित चन्नी तंत्रज्ञान शिक्षण मंत्री असताना ३ वर्षांपूर्वी पॉलिटीकल इंस्टिट्युटमध्ये भरती करण्यात आली होती. त्यावेळी २ अर्जदारांना लेक्चरर पदासाठी एकाच जागेवर पोस्टिंग हवी होती. त्यावेळी चन्नी यांनी टॉस करुन एका अर्जदाराला त्याच्या मर्जीनुसार पोस्टिंग दिली.
आयएएस अधिकाऱ्याला मॅसेज -चन्नींवर २०१८ मध्ये एका महिला आयएएस अधिकाऱ्याला आक्षेपार्ह मॅसेज पाठवण्याचा आरोप झाला. त्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी चन्नींना माफी मागण्यास सांगितले. कॅप्टन यांनी नंतर हे प्रकरण संपल्याचा दावा केला. पण, गतवर्षी मे महिन्यात अचानक या प्रकरणाचे बिंग पुन्हा फुटले. पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनिषा गुलाटी यांनी चन्नी यांच्यावर कारवाई झाली नाही तर आपण उपोषणावर बसणार असा इशारा दिला. पण, चन्नी यांची मुख्यंमत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्या हे प्रकरण टाळू लागल्या. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपत प्रवेश केला.
ग्रीन बेल्ट तोडून रस्ता तयार केला -२०१८ मध्ये मंत्रीपदी निवड झाल्यानंतर चन्नी यांनी एका ज्योतिषीच्या सल्ल्यानुसार आपल्या सरकारी घराचा नकाशा बदलला. राजकारणात यश मिळवण्यासाठी त्यांनी चंदीगड स्थित आपल्या घरात प्रवेश करण्याची दिशा पूर्वेकडे करवून घेतली. यासाठी त्यांनी ग्रीन बेल्ट तोडून रस्ता तयार केला. पण, चंदीगड प्रशासनाने पुन्हा हा रस्ता बंद करुन त्या ठिकाणी ग्रीन बेल्ट तयार केला.
हत्तीची सवारी-राजकारणात यशस्वी होण्यासाठी चन्नी यांनी खरड स्थित आपल्या घरात हत्तीची सवारी केली. पंजाबचे मुख्यमंत्री होण्यासाठी एका ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार त्यांनी असे केल्याची बाब नंतर उजेडात आली. पण, त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर हा टोटका यशस्वी ठरल्याची खूप चर्चा झाली.
पॅचवर्कचे बयान -चन्नी काही काळ पंजाब विधानसभेचे विरोधी पक्षनेतेही राहिले. त्यावेळी अकाली-भाजपचे सरकार होते. सुखबीर सिंग बादल उपमुख्यमंत्री होते. सुखबीर यांनी विधानसभेत चन्नी यांना २००२ ते २००७ पर्यंत अमरिंदर सरकारने केलेले एखादे काम सांगण्याचे आव्हान दिले. त्यावर चन्नी यांनी अमरिंदर सिंग यांनी संपूर्ण राज्यातील रस्त्यांचे पॅचवर्क केल्याचे अजब विधान केले.
पीएचडी एंट्रेस पास करता आली नाही -चन्नी यांनी २०१७ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर पीएचडी एंट्रेस दिली होती. त्यावेळी चन्नी यांना लाभ पोहोचवण्यासाठी पंजाब विद्यापीठाने एससी/एसटी उमेदवारांसाठींच्या नियमांत बदल केल्याचे आरोप झाले. त्यानंतर चन्नी या परीक्षेतही नापास झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.