आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीरमची नवीन व्हॅक्सीन:लहान मुलांना कोरोनाच्या गंभीर लक्षणांपासून वाचवू शकते निमोनियाची स्वदेशी लस

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 4-5 कोटी व्हॅक्सीनचा स्टॉक तयार, जुलैपर्यंत 10 कोटी डोज तयार करण्याची योजना

जगातील सर्वात मोठी व्हॅक्सीन मॅन्युफॅक्चरर सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने भारतातील पहिली स्वदेशी निमोकोक्कल व्हॅक्सीन- 'निमोसिल' लॉन्च केली आहे. कंपनीने सांगितले की, कोविड-19 च्या गंभीर लक्षणांपैकी एक आहे- निमोनिया. सध्या जगभरात जे कोविड-19 व्हॅक्सीन तयार करत आहेत, त्यांच्या चाचण्या लहान मुलांवर केल्या नाहीत. त्यामुळे सीरमची ही व्हॅक्सीन लहान मुलांना कोरोनाच्या गंभीर लक्षणांपासून संरक्षण देईल.

SII चे एक्जीक्यूटिव डायरेक्टर डॉ. राजीव ढेरे म्हणाले की, "कोविड-19 च्या गंभीर लक्षणांपैकी एक आहे निमोनिया. सध्या कोविड-19 साठी जे व्हॅक्सीन तयार केले जात आहे, ते लहान मुलांसाठी नाही.त्यामुळे आशा केली जात आहे की, 'निमोकोक्कल' व्हॅक्सीन लहान मुलांचे गंभीर निमोनियापासून संरक्षण करू शकते."

व्हॅक्सीनमुळे मुलांना मोठ्या काळासाठी सुरक्षा मिळेल

निमोसिलला SII ने PATH आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या सोबत मिळून तयार केले आहे. ही भारतासह कमी आणि मध्यम कमाई असलेल्या देशांमध्ये व्हॅक्सीन उपलब्ध करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. ही नवीन लस मुलांना निमोकोक्कल आजारांविरोधात मोठ्या काळापर्यंत सुरक्षा देईल.

आरोग्य मंत्री म्हणाले- व्हॅक्सीन पब्लिक हेल्थसाठी महत्वाचे

व्हॅक्सीनच्या लॉन्चिंगदरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन उपस्थित होते. यावेळे ते म्हणाले की, हे देशाच्या पब्लिक हेल्थकेअरसाठी महत्वाचे यश आहे. ही स्वस्त आणि हाय-क्वालिटी व्हॅक्सीन मुलांचे निमोकोक्कल आजारांपासून रक्षण करेल.

कोवीशील्डला लवकर मंजुरी मिळेल

SII चे सीईओ अदार पूनावाला यांचा दावा आहे की, कोविड-19 साठी एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीने तयार केलेली व्हॅक्सीन- कोवीशील्डला जानेवारीमध्ये इमरजंसी अप्रुव्हल मिळू शकते. सध्या 4-5 कोटी व्हॅक्सीनचा स्टॉक तयार आहे. जुलै-2021 पर्यंत कंपनी 10 कोटी व्हॅक्सीन तयार करेल.

बातम्या आणखी आहेत...