आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेची कंपनी नोवाव्हॅक्सची लस सप्टेंबरपर्यंत भारतात लॉन्च होऊ शकते. याला भारतात सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) कोवाव्हॅक्स या नावाने बनवले जाईल. SII ने गुरुवारी सांगितले की, आम्ही सप्टेंबरपर्यंत व्हॅक्सीन भारतात लॉन्च करण्याची तयारी करत आहोत. जुलैपासून बालकांवर याचे क्लीनिकल ट्रायल सुरू करण्याची योजना आहे.
ब्रिटेनमध्ये झाली ट्रायल
ब्रिटेनमध्ये झालेल्या नोवाव्हॅक्सच्या तिसऱ्या फेजच्या ट्रायलचे परीणाम आले आहेत. यापूर्वी कंपनीने सोमवारी सांगितले होते की, कोरोना व्हायरसविरोधात ही खूप प्रभावी ठरली आहे. व्हॅक्सीनने माइल्ड, मॉडरेट आणि सीव्हर डीजीजमध्ये 90.4% फाइनल एफिकेसी दाखवली आहे.
चांगल्या निकालांमुळे लवकरच या लसीला आपत्कालीन वापरास मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे. ही लस वेगवेगळ्या प्रकारांपासून संरक्षण करण्यासाठी देखील प्रभावी ठरली आहे. जगभरातील लस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हे निकाल जाहीर केले.
SII 200 कोटी डोस तयार करेल
नोवाव्हॅक्स आणि भारतीय कंपनी SII ने कोरोना लसीचे 200 कोटी डोस तयार करण्याचा करार केला आहे. ऑगस्टमध्ये हा करार झाला होता. करारानुसार कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देश आणि भारतासाठी किमान 100 कोटी डोसचे उत्पादन केले जाईल.
आता चाचणीच्या निकालानंतर, कंपनी 2021 च्या तिसर्या तिमाहीत अमेरिका, यूके आणि युरोपमध्ये आणीबाणीच्या वापरासाठी मान्यता घेऊ शकते.
परदेशात झाली आहे बालकांवरील ट्रायलला सुरुवात
नोवाव्हॅक्सने परदेशात आपल्या लसीची मुलांवर चाचण्या सुरू केल्या आहेत. कंपनीने 12-17 वर्षे वयोगटातील 3,000 मुलांवर चाचण्या सुरू केल्या आहेत. अद्याप कोणत्याही देशात हे मंजूर झालेले नाही. यात भाग घेणार्या मुलांवर 2 वर्ष देखरेख ठेवली जाईल.
अमेरिकेने यापूर्वीच 12 हजार कोटींचा करार केला आहे
नोवाव्हॅक्सने अमेरिकेला 10 कोटी डोस देण्याचा करार केला आहे. हा करार 1.6 अब्ज डॉलर्स (सुमारे 12 हजार कोटी रुपये) चा आहे. यासह ब्रिटन, कॅनडा आणि जपानबरोबर लसींच्या पुरवठ्याबाबतही करार झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.