आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोविशिल्ड:लसीच्या आपत्कालीन वापराची सीरमने मागितली परवानगी, कोविशिल्डचे 4 कोटीहून अधिक डोस तयार

नवी दिल्ली / पवनकुमारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात मोठी औषध निर्मिती करणारी कंपनी असलेल्या पुण्यातील सीरम इंडियाने आपल्या कोविशिल्ड या लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेकडे मागितली आहे. शुक्रवारी अशीच परवानगी अमेरिकेच्या फायझरने मागितली होती.

ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्रॉजेनका कंपनीने कोविशिल्ड ही लस विकसित केली आहे. याचे उत्पादन सीरम मोठ्या प्रमाणात करत आहे. ही लस सुरक्षित व कोरोनावर प्रभावी गुणकारी असल्याचे सीरमने म्हटले आहे. ही लस २ ते ८ अंश तापमानातच सुरक्षित राहू शकते. फायझरची लस उणे ७० अंश तापमानात सुरक्षित राहते. सीरमने थंड राहाव्यात म्हणून हिमाचल प्रदेशात बऱ्याच लस पाठवल्या आहेत. त्यामुळे तुलनेने सीरमची लसीचा वापर व वितरण सोपे मानले जात आहे. कोविशिल्डचे 4 कोटीहून अधिक डोस तयार असून जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध करून देण्याची सीरमची तयारी आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser