आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हॅक्सीन ट्रॅकर:सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशील्ड लसीला WHO कडून मिळू शकते जगभरात वापरण्याची मंजुरी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • WHO चे डायरेक्टर जनरल म्हणाले - रॅपिड असेसमेंटसाठी संपूर्ण डेटा सेट्ची प्रतिक्षा

पुण्याच्या सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) च्या कोव्हिशील्डला लवकरच जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरण्याची परवानगी मिळू शकते.कोव्हिशील्डला 3 जानेवारी रोजी भारतातील औषध नियामकाने आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली होती. 16 जानेवारीपासून भारतात सुरू झालेल्या लसीकरणासाठी सरकारने SIIकडून कोविशील्डच्या 1.1 कोटी डोस घेण्याचा करार केला आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी एकत्रित मिळून कोव्हिशील्ड लस निर्माण केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोज अॅडनॉम घेब्रेयेसस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्हाला आशा आहे की लवकरच SII जलद मूल्यांकनासाठी संपूर्ण डेटा सेट उपलब्ध केला जाईल. याच्या आधारे, डब्ल्यूएचओ निर्णय घेईल की अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची लस आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जाऊ शकते किंवा नाही.