आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Set Up Immunization Centers Now For The Next Phase: Centre's New Instructions To The States

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीकरण:पुढील टप्प्यासाठी आतापासूनच लसीकरण केंद्रे तयार करा : केंद्राचे राज्यांना नवे निर्देश

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक मेपासून 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरण होणार आहे सुरू

देशात कोरोनाचा वाढता संसर्ग आणि ऑक्सिजनच्या तुटवड्याचे संकट वाढत असतानाच केंद्र सरकारने कोरोना लढा व लसीकरणाच्या पुढील टप्प्यांशी संबंधित निर्देश जारी केले आहेत. त्यात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापासूनच कोणत्या रुग्णालयांत लसीकरण केंद्रे असतील हे निश्चित करण्यास सांगण्यात आले आहे.

एक मेपासून १८ ते ४४ वर्षांच्या नागरिकांचे लसीकरण सुरू होत आहे. ते लक्षात घेऊनच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि आर. एस. शर्मा यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अतिरिक्त सचिव/प्रधान सचिवांसाठी तपशीलवार दिशानिर्देश आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ), वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद तसेच अशाच प्रकारच्या खासगी क्षेत्रातील तज्ञ संस्था यांच्याकडूनही मदत घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.

लसीकरण केंद्रांसाठी ही व्यवस्था आवश्यक
{ सर्व सरकारी आणि खासगी कोरोना लसीकरण केंद्रांची कोविन अॅपवर नोंदणी करणे अनिवार्य असेल. { सर्व लसीकरण केंद्रांच्या लसीकरणाचे रेकॉर्ड ठेवावे लागेल. डिजिटल लसीकरण प्रमाणपत्र जारी करावे लागेल. { कोविड केअर सेंटर्सवर पुरेशी कोल्ड चेन उपकरणे आणि क्षमता असावी. { लसीकरणासाठी पुरेशी जागा आणि प्रतीक्षालय असावे. { लस देणाऱ्या प्रशिक्षित लोकांची पुरेशी संख्या असावी. { लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यास तयार असलेली खासगी रुग्णालये व औद्योगिक संस्था आपल्या केंद्रासाठी लसीचा डोस थेट उत्पादकांकडून मिळवू शकतात. {लसीकरण केंद्रांना कोविन अॅपवर लसीचा प्रकार,साठा, किंमत याची माहिती द्यावी लागेल.

गर्दी नियंत्रित करण्यासाठी ही व्यवस्था
लसीकरण केंद्रांवर गर्दी नियंत्रित करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सर्वांना लस देण्याची सुरुवात झाल्यानंतर लसींची मागणी वाढेल, असा अंदाज आहे. वाद होऊ नये म्हणून सुरुवातीला केंद्रांवर नोंदणी करण्याची परवानगी नसेल.

मोफत डोस देणेही सुरूच राहील : राष्ट्रीय कोविड-१९ लसीकरण धोरणानुसार शासकीय लसीकरण केंद्रांत आरोग्य, फ्रंटलाइन कर्मचारी आणि ४५ वर्षांवरील लोकांना केंद्र सरकारतर्फे मोफत डोस देण्याची प्रक्रिया सुरूच राहील. खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी एक मे पासून थेट उत्पादकांकडून लस खरेदी करावी लागेल.

पत्रातील निर्देश असे आहेत
{ १८ ते ४४ वर्षांच्या लोकांसाठी कोविन वेब पोर्टलवर नोंदणी आणि लसीकरणासाठी वेळ घेणे अनिवार्य असेल. { ४५ वर्षांवरील लोक लसीकरण केंद्रावरच नोंदणी करून लस घेऊ शकतील. सध्या हीच पद्धत आहे. { १८ ते ४४ वर्षांसाठी कोविन पोर्टल, आरोग्य सेतू अॅपवर नोंदणी २८ एप्रिलपासून सुरू होईल. { डोस घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे पूर्वीसारखीच आहेत. { उत्पादकांनी आधीच लसीचे दर जाहीर केले आहेत. एक मेपासून ते लस उपलब्ध करून देतील.

बातम्या आणखी आहेत...