आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Seven Accused Arrested In JEE Mains Scam, Including Two Directors Of Affinity Education

नवी दिल्ली:जेईई मेन्स घोटाळ्यात सात आरोपी अटकेत, एफिनिटी एज्युकेशनच्या दोन संचालकांचा समावेश

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेईई मेन्स-२०२१च्या घोटाळा प्रकरणी सीबीआयने ७ जणांना अटक केली आहे. यात एफिनिटी एज्युकेशन प्रा. लि.च्या दोन संचालकांचा समावेश आहे. यात झारखंडमधील जमशेदपूरचा रणजितसिंह ठाकूर ऊर्फ रणजित शर्मा हा पेपर सोडवून देणारा प्रमुख हस्तक होता.

बंगळुरूत इंजिनिअरिंग करणाऱ्या रणजितची इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देणाऱ्या टोळीशी ओळख झाली. यातून हळूहळू तो “मुन्नाभाई’ झाला. पेपर सोडवून देत त्याने कोट्यवधी रुपये कमावले. अटक करण्यात आलेल्यांत एफिनिटीचा संचालक सिद्धार्थ कुमार, विश्वंभर मणी त्रिपाठी आणि कर्मचारी ऋतिक सिंह, अंजुम दावुदानी, अनिमेष सिंह आणि अजिंक्य पाटील यांचा समावेश आहे.

पुण्यातून चालवले सिंडिकेट : दरम्यान, एफआयआरमध्ये एफिनिटीचा संचालक गोविंद वार्ष्णेय यांच्यासह काउन्सेलर सीमा हिचेही नाव आहे. दिल्लीतील दोन विद्यार्थ्यांचीही यात नावे आहेत. रणजितचे जाळे पुणे, सोनिपत, पानिपत, सोलन (हि.प्र.) या भागात पसरलेले होते. विद्यार्थी फक्त माऊस धरून ठेवत, सॉल्व्हर पेपर सोडवत. या घोटाळ्याच्या तपासात अनेक गोष्टी उघड झाल्या.

महाराष्ट्रात अंजुम होती दलाल : या टोळीतील लोक काउन्सेलर होऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करत. यासाठी महाराष्ट्रात अंजुम दावदानी आणि दिल्लीत सीमा या दोघी काम करत. विद्यार्थी तयार झाले की त्यांची भेट एफिनिटीच्या संचालकांशी घालून दिली जात असे.

बातम्या आणखी आहेत...