आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रह्मपुत्रा नदीत भीषण अपघात:आसामात 100 प्रवाशांनी भरलेले 2 जहाज एकमेकांवर आदळले, अपघातानंतर 65 जण बेपत्ता; शोध आणि बचावकार्य सुरू

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आसाम जोरहाटमध्ये बुधवारी संध्याकाळी मोठा अपघात झाला आहे. येथे ब्रह्मपुत्रा नदीवर 100 प्रवासी घेऊन जाणाऱ्या दोन बोटी एकमेकांना धडकल्या आहेत. अपघातानंतर सुमारे 65 लोक बेपत्ता आहेत, ज्यांचा शोध सुरू आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

दोन्ही बोटी वेगवेगळ्या दिशांनी येत होत्या. एक बोट जोरहाटमधील निमटीघाटहून माजुलीकडे येत होती, तर दुसरी माजुलीहून जोरहाटकडे जात होती. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, बोट माजुली घाटापासून फक्त 100 मीटर अंतरावर होती. बोटींमध्ये सुमारे 25 ते 30 बाईकही ठेवण्यात आल्या होत्या.

एनडीआरएफ टीम बचाव मोहीम राबवून लोकांना वाचवत आहे. अपघातानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी राज्यमंत्री बिमल बोहरा यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी उद्या निम्ती घाटावर जाणार असल्याचे सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...