आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Severe Effects Of Childhood Exposure To Violent TV Programs For Decades; Violence Seems Normal, A Problem In Adolescence

दिव्य मराठी विशेष:बालपणी हिंसक टीव्ही कार्यक्रम पाहण्याचे गंभीर परिणाम दशकांपर्यंत; हिंसा सामान्य वाटते, किशोरावस्थेत अडचण

ओटावा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्हीवर गुन्हेगारी जगताशी निगडित कार्यक्रम, हिंसेची दृश्ये असणारे शो आणि रक्तरंजित अॅक्शन चित्रपट आवडणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. अनेकदा आई-वडीलच मुलांसमवेत असे कार्यक्रम आणि चित्रपटांचा आनंद घेतात. अशा लोकांसाठी सावधानतेचा इशारा! युनिव्हर्सिटी ऑफ मॉन्ट्रियालचे एक संशोधन सांगते की, मारहाणीचे चित्रपट आणि गुन्हेगारी जगताशी निगडित हिंसक टीव्ही शो मुलांचे बालपणच नव्हे, किशोरावस्थाही उद्ध्वस्त करू शकतात. बालपणी पाहिलेल्या हिंसक कार्यक्रमांचा प्रभाव त्यांच्यावर दशकांपर्यंत राहतो. त्यांची शिकण्याची क्षमता कमी होते. जर्नल ऑफ डेव्हलपमेंटल अँड बिहेव्हिअरल पिडीयाट्रिक्समध्ये प्रकाशित संशोधन सांगते की, तीन वर्षाच्या वयात अशा हिंसक गोष्टी पाहिलेली मुले किशोरावस्थेतही भावनिकदृष्ट्या बेचैन असतात.

युनिव्हर्सिटी ऑफ मॉन्ट्रियालचे प्राध्यापक आणि या संशोधनाचे प्रमुख लिंडा पगानी सांगतात की, लहान वयात, खासकरून शाळेत जाण्याआधी मुले टीव्हीवर जे पाहतात ते त्यांना खरे वाटते. ते त्याप्रती अधिक संवेदनशील होतात. चित्रपट तसेच कार्यक्रमात एखाद्या समस्येचे निराकरण हिंसेने झाल्याचे दाखवले जाते. मग तो नायक असो की खलनायक. मग मूल हिंसेला सामान्य मानू लागते. ते मोठे होऊनही शाळेत मिसळत नाही. शाळेच्या मध्यकाळात ते किशोरवयीन होते. मात्र बालपणी हिंसेला सामान्य समजणाऱ्या किशोरवयीनांवर औदासिन्य आणि नैराश्याचा पगडा असतो.

पगानी सांगतात की, किशोरवयीनांसाठी ही मोठी विचित्र परिस्थिती आहे. आपण कोणत्या गोष्टीशी लढत आहोत, हेच त्यांना माहित नाही. त्यासाठी पालकांनी त्याच्याशी सामाजिक मूल्यांवर बोलावे. लोकांमध्ये कसे मिसळावे, कसे बोलावे हे शिकवावे. सर्वसाधारण शिष्टाचार सांगावा. जग भीतीदायक आहे, हे त्यांच्या मनातून काढून टाकावे. हिंसक कार्यक्रम पाहणाऱ्या ३.६ ते ४.६ वर्षाच्या मुलांमध्ये हे संशोधन करण्यात आले. त्यानंतर ते १२ वर्षांचे झाल्यानंतर त्यांची वर्तणूक तपासण्यात आली. शिक्षकांची प्रतिक्रिया घेण्यात आली. मुलांशीही संवाद साधण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...