आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोव्यातील संगोल्डा गावात सुरू असलेला सेक्स रॅकेटचा गोवा पोलिस गुन्हे शाखेने भांडाफोड केला आहे. या कारवाईतून गोवा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका टीव्ही अभिनेत्रीसह तीन महिलांची सुटका केली. तसेच या प्रकरणी दलालास अटक केली.
गुप्त माहितीच्याआधारे पोलिसांनी सापळा रचला होता. पोलिसांनी हैदराबादमधील एका दलालासोबत 50 हजारांचा सौदा केला. यावेळी दलालने तीन महिलांना सादर करताच त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या महिलांचे वय हे 30 ते 37 वर्षांच्या दरम्यान आहे.
असा रचला पोलिसांनी सापळा
गोवा पोलिसांनी सांगिल्यानुसार, गोवा गुन्हे शाखेला हाफिज सैयद बिलाल नावाची व्यक्ती देह व्यापार करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. ग्राहक बनत पोलिसांनी बिलालशी संपर्क साधला आणि 50 हजारांचा सौदा केला. या सौद्याअंतर्गत संगोल्ड गावातील एका हॉटेलमध्ये पैसे देण्याचे ठरविण्यात आले. यावेळी 17 मार्चला दलाल तीन महिलांसह हॉटेलमध्ये दाखल झाला, तेव्हा तात्काळ पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
प्राचीन काळापासून देहविक्री
जगभरात प्रत्येक देशात देहविक्री हा प्राचीन काळापासून उदरनिर्वाहासाठी चालत आलेला व्यवसाय आहे. काही ठिकाणी हा व्यवसाय कायदेशीर तर काही ठिकाणी बेकायदेशीर आहे. यातून बऱ्याच महिला पोट भरतात. अनेकदा देहविक्रीत अल्पवयीन मुली दिसतात. गरिबीमुळे पालक आपल्या मुली हा व्यवसाय करणाऱ्यांना विकत असल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.