आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण:महिलांसाठी दिल्ली सर्वात असुरक्षित, महाराष्ट्रात तुलनेने कमी, पंजाब दुसऱ्या क्रमाकांवर

नवी दिल्ली / पवनकुमार24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण होण्याचे प्रमाण दिल्लीत सर्वाधिक आहे. या ठिकाणी ऑगस्ट २०२२ मध्ये एकूण ११.२ लाख महिलांनी तक्रारी केल्या आहेत. १०.५३ लाख तक्रारींसह पंजाब दुसऱ्या क्रमांकावर असून गुजरातचा क्रमांक (१० लाख) तिसरा आहे. महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाच्या अहवालात ही आकडेवारी समोर आली. विविध राज्यांमधून आतापर्यंत ७०.१७ लाख तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी ३१.७८ लाख म्हणजे सुमारे ४५ टक्के तक्रारी दिल्ली-पंजाब आणि गुजरातमधील आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्रात अशा तक्रारींची संख्या खूपच कमी म्हणजे २.९५ टक्के आहे.

टॉप-100 कंपन्यांमध्ये 1 वर्षात लैंगिक शोषणाच्या तक्रारींमध्ये 27% वाढ डेटा अॅनालिसिस फर्मनुसार,बीएसई -१०० निर्देशांकातील कंपन्यांमध्ये सन २०२०-२१ च्या तुलनेत २०२१-२२ मध्ये कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाच्या तक्रारी ५९५ वरुन ७५९ वर गेल्या आहेत. २०१९-२० मध्ये ‘मी टू’ मोहिमेवेळी तक्रारींचे प्रमाण ९९९ वर गेले होते.

50% महिलांना किमान एक वेळ हा त्रास 55% महिला तर तक्रार करणेही टाळतात कार्यालयात, कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणासंबंधी याच वर्षी मे महिन्यात आलेल्या एका वार्षिक अहवालात म्हटले आहे की, ५० टक्के महिलांना किमान एक वेळा या त्रासाचा सामना करावा लागला आहे. परंतु त्यापैकी ५५ टक्के महिलांना तक्रार करण्याचे धैर्य झाले नाही.

बातम्या आणखी आहेत...