आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • SFJ Terrorist Gupatwant Pannu Threat To Prime Minister Modi, PM Modi Punjab Dera Byas Visit Updates

PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी पन्नूची धमकी:डेरा मुखींना पंतप्रधानांना न भेटण्याचा सल्ला, म्हटले- काही अनुचित प्रकार घडल्यास ते स्वतः जबाबदार असतील

अमृतसर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमृतसरला पोहोचले आहेत. ते बियास येथील राधास्वामी डेरा येथे पोहोचतील. येथे ते डेरा मुखींची भेट घेणार आहेत. परंतु त्यांच्या आगमनापूर्वी सिख फॉर जस्टिस (एसएफजे) प्रमुख आणि दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने त्यांना धमकी दिली आहे. इतकंच नाही तर डेरा मुखींनाही त्यांना भेटू नका असा इशारा दिला आहे.

पन्नूने एक व्हिडिओ जारी केला आहे. ज्यात त्याने अमृतसरमध्ये शुक्रवारी झालेल्या सुधीर सुरी यांच्या हत्येचाही उल्लेख केला होता. पन्नूने डेरा राधास्वामींना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटू नका असे सांगितले आहे. मोदी हे शेतकऱ्यांचे मारेकरी असल्याचे पन्नूचे म्हणणे आहे. जर डेरा मुखी त्यांच्याशी भेटले आणि यादरम्यान काही अनुचित प्रकार घडला तर त्याला डेरा जबाबदार असेल, असा इशाराही त्याने दिला.

पन्नूने या व्हिडिओमध्ये सुधीर सुरी यांच्या हत्येचाही उल्लेख केला आहे.
पन्नूने या व्हिडिओमध्ये सुधीर सुरी यांच्या हत्येचाही उल्लेख केला आहे.

जशास तसं उत्तर मिळेल...

यावेळी पन्नूने पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुनी संबोधले. एवढेच नाही तर त्याने स्वत:ला बॅलेट व्होटिंगचे समर्थक आणि पंतप्रधान मोदींना बुलेट व्होटिंगचे समर्थक म्हटले. यासोबतच पंजाबमध्ये तुम्ही ज्या भाषेत बोलाल, त्याच भाषेत तुम्हाला उत्तर मिळेल, असेही तो म्हणाला.

हे गुजरात नसून पंजाब आहे, असा इशारा दहशतवादी पन्नूने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे. यादरम्यान पन्नूने पंजाबला मुक्त करण्यासाठी मतदान केल्यानंतर 26 जानेवारीनंतर भारतात येण्याचेही म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...