आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरात निवडणूक सभा:शहा म्हणाले, काँग्रेस, माकपशी टिपरा मोथाची हातमिळवणी

आगरतळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी सांगितले की, प्रद्युत किशोर देबबर्मन यांच्या नेतृत्वाखालील टिपरा मोथा पार्टीला मत देणे सीपीआयएम-काँग्रेस आघाडीला मत देण्यासमान आहे. त्यांनी सांगितले की, माकपा आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाबाबत करार झाला आहे. टिपरा मोथा या राजकीय आघाडीत “अंडर-टेबल पार्टनर’ आहे. शहा राज्यात वेगवेगळ्या ठिकाणच्या निवडणूक सभांत बोलत होते. त्यांनी काँग्रेसला भ्रष्ट आणि माकपला गुन्हेगार ठरवले. शहा यांनी आदिवासी क्षेत्रांत बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करत सांगितले की, बांगलादेशी घुसखोरांमुळे आदिवासी क्षेत्रांतील लोकसंख्याशास्त्र बदलत आहे. माकपनंतर काँग्रेसने पेन्शन लागू करण्याचे आश्वासन दिले: काँग्रेसने सोमवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करणे व ५० हजार नोकऱ्यांचे आश्वासन दिले. याशिवाय १४५० युनिट मोफत वीज व शेत मजुरांची मजुरी वाढवण्याचे सूतोवाच केले.

बातम्या आणखी आहेत...