आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद मुदासिर अहमदच्या बहिणीच्या विनंतीचा मान:1200 फूट उंच शहीदाच्या कबरीवर फुले वाहवण्यासाठी चालत गेले शहा

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साधारणत: प्रोटोकॉल तोडत नाहीत. मात्र, शहीद मुदासिर अहमदच्या बहिणीच्या विनंतीचा त्यांनी मान ठेवला. ठरल्याप्रमाणे अमित शहा ५ ऑक्टोबरला शहीद पोलिस अहमदच्या कुटुंबियांची भेट घेणार होते. अहमदचे कुटुंब उरीत राहते. शहा तिथे गेले तेव्हा सुरक्षेवरून कुटुंबियांना भेटण्याची व्यवस्था डोंगराच्या खाली मैदानात केली होती. शहा यांच्या भेटीत मुदासिरच्या बहिणीने विचारले, तुम्ही माझ्या भावाच्या कबरीवर फूल चढवणार ना? सूत्रांनुसार, ही कबर आसपास असेल, असे शहांना वाटले. त्यामुळे त्यांनी लगेच होकार दिला. मात्र, कबर येथून १२०० फूट उंच डोंगरावर असल्याचे ती म्हणाली तेव्हा कर्तव्यावरील अधिकाऱ्यांनी तिला झापले. असे असतानाही तिने शहांना पुन्हा विनंती केली तेव्हा ते म्हणाले, मी डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करेन. यानंतर ते १२०० फूट उंच डोंगावर गेले. तिथे मुदासिरच्या कबरीवर फुले वाहिली.

बातम्या आणखी आहेत...