आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shahid Iqbal Choudhary Arrested | Jammu Kashmir IAS Officer Shahid Iqbal Choudhary House Raided By CBI Today In Srinagar; News And Live Updates

जम्मू-काश्मीरमध्ये सीबीआयची छापेमारी:बंदूक परवाना घोटाळ्यात सीबीआयची 40 ठिकाणांवर छापेमारी; शाहिद चौधरीसह अनेक अधिकारी सीबीआयच्या घेऱ्यात

श्रीनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2017 मध्ये हा घोटाळा उघडकीस आला

केंद्रीय तपास यंत्रणने (सीबीआय) जम्मू-काश्मीरमध्ये बंदूक परवाना घोटाळ्याप्रकरणी 40 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. सीबीआयने याप्रकरणी निवडणूक लढवणारे आयएएस अधिकारी शाहिद इक्बाल चौधरी यांच्या घरीदेखील छापेमारी केली आहे. चौधरी हे 2009 बॅचचे आयएएस अधिकारी असून ते सध्या जम्मू-काश्मीरमधील आदिवासी कार्य विभागातील प्रशासकीय सचिवपदी कार्यरत आहे.

आयएएस अधिकारी शाहिद चौधरी यांनी कठुआ, रियासी, राजौरी आणि उधमपूर जिल्ह्यांचे उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे. दरम्यान, त्यांच्यावर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील हजारो लोकांना बनावट नावांवर परवाना दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी केंद्रीय एजन्सी कमीतकमी आठ माजी उपायुक्तांची चौकशी करीत आहे.

सीबीआयने अद्याप याबाबत अधिकृतपणे माहिती दिली नाही
सीबीआयने अद्याप याबाबत अधिकृतपणे माहिती दिली नाही

2017 मध्ये हा घोटाळा उघडकीस आला
राजस्थाने एटीएसने 2017 मध्ये हा घोटाळा उघडकीस आणला होता. ज्यामध्ये 50 पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली होती. एटीएसच्या मते, सैन्य दलातील जवानांच्या नावे 3 हजारांपेक्षा जास्त परवानग्या दिल्या आहेत. याप्रकरणी जम्मू-काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल एन.एन. वोहरा यांनी या प्रकरणातील तपास सीबीआयकडे सोपविला होता.

बातम्या आणखी आहेत...