आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला कस्टम अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर रोखल्याची बाब उजेडात आली आहे. विमानतळावर तैनात एअर इंटेलिजेंस यूनिट अर्थात AIU च्या सूत्रांनी सांगितले की, शाहरुख शुक्रवारी रात्री शारजाहून परतला होता. त्यावेळी त्याच्याकडे 18 लाख रुपयांच्या घड्याळींचे महागडे कव्हर आढळले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याला काही वेळ रोखून धरले. या घड्याळींसाठी शाहरुखला सुमारे 6.83 लाख रुपयांची कस्टम ड्यूटी मोजावी लागली.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, शाहरुख खान एका खासगी चार्टर्ड प्लेनहून मुंबईला पोहोचला होता. त्याला T-3 टर्मिनलवर शुक्रवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला रोखले. यावेळी झालेल्या तपासणीत त्यांच्या बॅगेत Babun & Zurbk घड्याळ, Rolex घड्याळीचे 6 डब्बे, Spirit ब्रँडचे घड्याळ, अॅपल सीरीजच्या घड्याळी आढळल्या. तसेच त्यांचे रिकामे बॉक्सही आढळले.
शाहरुखला सोडले, बॉडीगार्डने भरला दंड
एअरपोस्टवर तासभर चाललेल्या प्रक्रियेनंतर शाहरुख व त्याची मॅनेजर पूजा ददलानीला सोडण्यात आले. पण शाहरुखचा बॉडीगार्ड रवी व त्याच्या टीमच्या उर्वरित सदस्यांना थांबवून ठेवण्यात आले. यासंबंधीच्या वृत्तानुसार, शाहरुखचा बॉडीगार्ड रवीने 6 लाख 87 हजार रुपयांची कस्टम ड्यूटी भरली. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सकाळचे 8 वाजले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी रवीची सुटका केली.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याला गेला होता किंग खान
यासंबंधीच्या वृत्तानुसार, शाहरुख खान आपल्या टीमसोबत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रायव्हेट चार्टर्ड प्लेनने दुबईला गेला होता. याच विमानाने तो शुक्रवारी रात्री साडे 12 वा. मुंबईत परतला. विमानतळावरील रेड चॅनल पार करताना कस्टमने त्यांना थांबवून त्यांच्या सामानाची तपासणी केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.