आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाफिया अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन हिला पोलिसांनी माफिया घोषित केले आहे. प्रयागराज पोलिसांच्या FIRमध्ये शाइस्ताचे वर्णन माफिया म्हणून करण्यात आले आहे. पोलीस शाईस्ताचा शोध घेत आहेत. शाइस्ता उमेश पाल खून प्रकरणातील आरोपी आहे. यूपी पोलीस शाईस्ताला पकडण्यासाठी सतत छापेमारी करत आहेत, मात्र आतापर्यंत हाती लागलेली नाही.
15 एप्रिलला अतिक-अश्रफची हत्या, 13 तारखेला असदचे एन्काउंटर
उमेश पाल खून प्रकरणातील आरोपी अतिक आणि त्याचा धाकटा भाऊ अश्रफ यांची 15 एप्रिल रोजी प्रयागराज येथील सरकारी रुग्णालयाच्या गेटवर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. पोलीस वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना अतिक-अश्रफ यांची हत्या झाली. यापूर्वी पोलिसांनी उमेश पाल हत्याकांडातील आरोपी असद आणि गुलाम यांना 13 एप्रिल रोजी झाशीतील एन्काउंटरमध्ये ठार केले होते.
उमेश पालची 24 फेब्रुवारी रोजी झाली होती हत्या
प्रयागराज पोलिसांनी आता अशाच एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माफिया अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन आणि आणखी एक आरोपी साबीर यांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून प्रयागराज पोलिसांनी अतिन जाफर या स्थानिकावर गुन्हा दाखल केला आहे. उमेश पाल आणि त्याच्या दोन शूटर्सच्या हत्येप्रकरणी दोघेही वॉन्टेड आहेत. उमेश पाल यांची 24 फेब्रुवारी रोजी प्रयागराजच्या धुमनगंज भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. उमेश पाल हा राजू पाल खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार होता.
साबिर आणि शाइस्ता यांच्यावर इनाम जाहीर
पोलिसांनी मंगळवारी छाप्यादरम्यान मोहम्मद अतीन जाफर याला ताब्यात घेतले होते. ज्याला चौकशीनंतर सोडून देण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, अतिकच्या हत्येनंतर 15 एप्रिल रोजी जाफरने शाइस्ता आणि साबीर यांना खुल्दाबाद भागातील त्यांच्या राहत्या घरी आश्रय दिला होता. उमेश पाल हत्येप्रकरणी साबिरवर पाच लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे.
शाइस्ताला अतिकच्या दफनविधीला उपस्थित राहायचे होते
पोलिसांनी सांगितले की, चौकशीदरम्यान जाफरने कबूल केले की शाइस्ता आणि साबिर 16 एप्रिल रोजी प्रयागराजच्या खुलदाबाद भागात त्यांच्या निवासस्थानी थांबले होते आणि दुसऱ्या दिवशी ते अज्ञात स्थळी निघून गेले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जाफरने त्यांना असेही सांगितले की, शाइस्ता आणि साबिर यांनी अतिकच्या अंत्यसंस्काराला गुप्तपणे उपस्थित राहण्याची योजना आखली होती, परंतु अंत्यसंस्काराच्या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त असल्याने शेवटच्या क्षणी त्यांची योजना बदलली.
गुड्डू मुस्लिम 4 वेळा निसटला
उमेश पालच्या हत्येला 73 दिवस उलटूनही तीन शूटर अजूनही फरार आहेत. अशा परिस्थितीत यूपी पोलीस बॉम्बर गुड्डू मुस्लिमचा शोध घेत आहेत. गुड्डू मुस्लिमकडे अतिकची अनेक गुपिते असल्याची पोलिसांची खात्री आहे. गुड्डू मुस्लिम चार वेळा एसटीएफच्या हातातून निसटल्याचे सांगितले जात आहे. उमेश पाल खून प्रकरणानंतर गुड्डू 11 एप्रिलपर्यंत अतिक आणि अश्रफच्या संपर्कात होता. गुड्डूचा मागोवा घेणाऱ्या एसटीएफ टीमने एका खासगी वृत्तवाहिनीला सांगितले की, एसटीएफला ओडिशापासून गुड्डू मुस्लिमाचा कोणताही सुगावा मिळालेला नाही. तत्पूर्वी, एसटीएफने असे इनपुट दिले होते की गुड्डू 5 मार्च रोजी मेरठहून बस घेऊन दिल्ली ISBT बस स्टँडवर पोहोचला होता. दिल्लीत पोहोचताच तो भूमिगत झाला. त्यानंतर 21 मार्च रोजी बिहारच्या भागलपूरमध्ये गुड्डू मुस्लिमचे लोकेशन सापडले. एसटीएफचे पथक येथे पोहोचले, मात्र तो येथूनही फरार झाला.
भागलपूरनंतर गुड्डू मुस्लिम रायगंजला पोहोचला. काही दिवसांनी तो येथूनही फरार झाला. गुड्डू मुस्लिम 2 एप्रिल ते 13 एप्रिलदरम्यान ओडिशात राहिला. एसटीएफचे पथक येथे पोहोचताच त्याने येथूनही पळ काढला. गुड्डूला आश्रय देणाऱ्या व्यक्तीने चौकशीदरम्यान सांगितले की, गुड्डूला खूप खोकला येत होता आणि तो आजारी दिसत होता.
पोलिसांकडून फार्म हाऊसच्या मालकाचा शोध
उमेश पाल यांच्या हत्येनंतर 5 लाखांचे बक्षीस असलेल्या गुड्डू मुस्लिमने कौशांबीच्या अवधान गावात आश्रय घेतल्याचेही वृत्त आहे. गुड्डू मुस्लिम अतिक अहमदचे जवळचे मित्र शमीम आणि नसीम यांच्या फार्म हाऊसवर थांबला होता. शेजारच्या गावातील प्रमुखाचाही आसरा देण्यात सहभाग होता. हे फार्म हाऊस कौशांबी जिल्ह्यातील पिपरी पोलिस स्टेशन हद्दीतील अवधान गावात आहे. पोलिसांच्या छाप्यानंतर दोन्ही फार्म हाऊस मालक फरार झाले आहेत.
वाचा संबंधित वृत्त
अतिक-अश्रफ हत्याकांडातील लिंक:अतिक अहमदवर गोळी झाडण्यापूर्वी 48 तासांआधी शूटर्सने नेमकं काय केले?
15 एप्रिल रात्री 10.35 वाजेच्या सुमारास प्रयागराजमधील केल्विन हॉस्पिटलबाहेर दोन जीप थांबल्या. काही पोलिस जीपमधून खाली उतरले. त्यांच्यामागे अश्रफ त्यानंतर अतिक अहमदही पोलिसांच्या मदतीने बाहेर आला. अशरफने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पँट घातली होती, तर अतिक अहमद पांढऱ्या कुर्त्यात होता, दोघांनाही हातकड्या होत्या. येथे वाचा सविस्तर बातमी
गँगस्टर अतिकचा मुलगा असदचे झाशीत एन्काउंटर:शूटर गुलामचाही खात्मा, उमेश पाल हत्येच्या 49 दिवसांनी यूपी पोलिसांचे यश
उमेश पाल हत्येप्रकरणी वॉन्टेड गँगस्टर अतिकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम मोहम्मद यांना यूपी पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. हे एन्काउंटर झाशीमध्ये झाले. दोघांवर 5 लाखांचे बक्षीस होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याजवळ विदेशी शस्त्रे सापडली आहेत. 24 फेब्रुवारी रोजी उमेश पालची हत्या केल्यापासून तो फरार झाला होता. पोलिस सतत त्यांचा शोध घेत होते आणि झाशी येथे त्यांचे लोकेशन मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचे एन्काउंटर केले. येथे वाचा सविस्तर बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.