आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बांग्लादेशी क्रिकेटर शाकिब अल हसनने कोलकातामध्ये देवी कालीची पुजा केल्यामुळे माफी मागितली आहे. शाकिबने मागच्या आठवड्यात गुरुवारी देवी कालीची पुजा केली होती. यानंतर बांग्लादेशातील एका नागरिकांना शाकिबला फेसबूकवरुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. अखेर आज शाकिबने माफी मागितली आणि परत असे करणार नाही, असेही सांगितले.
फेसबुक लाइव्हवर शाकिबला धमकी
शाकिब मागच्या गुरुवारी कोलकातामध्ये आला होता. येथे त्याने देवी कालीची पुजा केली होती. दुसऱ्या दिवशी तो परत आपल्या देशात गेला. शाकिब आपल्या देशात परतल्यानंतर सिलहट शहरातील मोहसिन तालुकदारने रविवारी फेसबूक लाइव्हदरम्यान शाकिबला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यावेळी त्याने शाकिबवर मुस्लिमांचा अपमान केल्याचा आरोप लावला होता. तसेच, शाकिबला त्याच्या शहरात येऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती.
अखेर शाकिबने मागितली माफी
शाकिबने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले, ‘‘मी परत त्या ठिकाणी (कोलकाता) जाणार नाही. झालेल्या या सर्व प्रकाराची मी माफी मागतो. मी पुढे असे होऊ देणार नाही. न्यूज चॅनेल आणि सोशल मीडियावर बातम्या पसरत आहेत की, मी खास पुजेसाठी गेले होतो. पण, असे नाही. जागरूक मुस्लिम असल्यामुळे मी असे करणार नाही.’’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.