आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील महिला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या बाबतीत अनेकपटींनी अग्रेसर आहेत. या क्षेत्रात जगातील टॉप-५ अर्थव्यवस्थांपैकी असलेल्या अमेरिकेनंतर भारताचा दुसरा क्रमांक आहे. लोकसंख्येत सरासरी बरोबरीत असलेल्या चीनशी तुलना केल्यास गेल्या साडेतीन वर्षांत व्यवसाय सुरू करणाऱ्या महिला चीनपेक्षा भारतात दुपटीहून जास्त आहेत. देशात नव उद्योजक महिलांची भागीदारी ११ टक्क्के, चीनमध्ये हा आकडा ५ टक्क्यांवर आहे. अमेरिकेत अशा उद्योगिनींचा वाटा १८ टक्के आहे. जर्मनीत ७ टक्के, जपान-३.६ टक्के आहे. ग्लोबल अांत्रप्रिन्युअर मॉनिटरच्या २०२२-२३ च्या ग्लोबल रिपोर्टमध्ये हे चित्र समोर आले. नवीन उद्योग-व्यवसायासाठी चांगल्या देशांत यूएई, सौदी, तैवाननंतर भारताचा चौथा क्रमांक लागतो.
कामगिरी... पुरुषांपेक्षा ३५ टक्के जास्त रिटर्न
- बेन अँड कंपनीच्या पाहणीनुसार महिलांची मालकी असलेल्या स्टार्टअपचे आरआेआय (रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट) पुरुष मालकांच्या फर्मच्या तुलनेत ३५ टक्के जास्त आहे.
- ग्रामीण भागात ४५ टक्क्यांहून जास्त महिलांनी स्वत:ची आेळख निर्माण करण्यासाठी व्यवसाय सुरू केला.
- सांख्यिकी मंत्रालयानुसार देशातील एकूण ५.८५ कोटी उद्योजकांपैकी ८० लाख महिला आहेत. यातून १४ टक्के भागीदारी दिसून येते. महिलांच्या कंपन्यांत २.२ ते २.७ कोटींवर लोक काम करतात. देशातील २० टक्के एमएसएमई इंटस्ट्रीजच्या मालक महिला आहेत. सुमारे २३ टक्के लोकांना याच कंपन्या रोजगार देत आहेत.
क्षमता... २०३० पर्यंत १७ कोटी नवीन रोजगार
- २०३० पर्यंत महिलांच्या मालकीच्या ३ कोटींहून जास्त नवीन कंपन्यांत १५-१७ कोटींपर्यंत रोजगार निर्मितीचा अंदाज आहे.
- देशाच्या जीडीपीमध्येही महिलांची भागीदारी सुमारे २२ टक्क्यांवर आहे. जगभरात सरासरी हे प्रमाण ४५ टक्के आहे.
- आमचे स्टार्ट-अप इकोसिस्टिममध्ये महिला लीडर्सच्या प्रगतीचा मोठा संकेत म्हणजे २०१९ ते २०२२ दरम्यान १७ टक्के गुंतवणुकीचे सौदे महिलांच्या स्टार्टअपशी झाले. या स्टार्टअपची मालकी महिलांकडे आहे. २०३० पर्यंत ही भागीदारी अनेक पटीने वाढेल.
- इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशननुसार महिला लीडर असलेल्या उद्योगांत जास्त गुंतवणूक होत आहे. जास्त रिटर्नसाठी जोखीम घेऊ शकतात.
- केपीएमजी सर्व्हेनुसार ४३ %महिला जास्त जोखमीसाठी तयार आहेत.
आव्हाने ; निधी उभारणी आणि मर्यादित व्याप्ती
- मर्यादित वुमन फ्रेंडली वातावरण : बहुतांश महिला उद्योजक शिक्षण, वस्त्र, सौंदर्य प्रसाधने इत्यादी क्षेत्रापुरत्या मर्यादित आहेत. मॅन्युफॅक्चरिंग, बांधकाम व अशा नफ्याच्या क्षेत्रात पुरुषांचा दबदबा आहे.
कौटुंबिक कामे : सुमारे ४३ कोटी रोजगारक्षम महिलांपैकी ३४ कोटी वेतन न मिळणाऱ्या कामांमध्ये आहेत. रोजगारक्षम १.९ कोटी महिलांच्या हाताला काम नाही.
निधीची व्यवस्था : देशात बहुतांश महिलांच्या नावावर मालमत्ता नसते. नवीन कर्जासाठी अडचणी येतात.
गेल्या ऑक्टोबरमध्ये केंद्राने महिलांसाठी ‘herSTART’ प्लॅटफॉर्म सुरू केला. स्टार्टअपसाठी महिन्याला २० हजारांपर्यंत मदतीची तरतूदही आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.