आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shankaracharya Said That The Corrupt In The Ram Temple Trust, The Chairman Of The Trust Is Irresponsible

राम मंदिर ट्रस्ट घोटाळा:बेजबाबदार चंपत रायना मोदींनी त्वरीत ट्रस्टवरून हटवावे, श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण ट्रस्ट घोटाळ्यावर शंकराचार्य बरसले

छिंदवाडा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्मिती ट्रस्टवर लागलेल्या आरोपांवरून आता शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे प्रतिक्रिया समोर आली आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय बेजबाबदार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना त्वरीत पदावरून दूर करावे असे शंकराचार्य म्हणाले आहेत. द्विपीठाधीश्वर जगदगुरूंनी नरसिंहपूर जिल्ह्यातील परमहंसी गंगा आश्रमात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राम मंदिर ट्रस्टवरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला.

भ्रष्ट माणसाला ट्रस्टवर बसवले, त्वरीत हटवा

उल्लेखनीय बाब म्हणजे, आम आदमी पक्षाने राम जन्मभूमी मंदिर निर्मिती ट्रस्टवर गंभीर आरोप केले. शंकराचार्य पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, सरकारने ट्रस्ट तर बनवला पण त्यामध्ये भ्रष्टाचारी लोकांना सामावून घेतले. चंपत राय आहेत तरी कोण? यापूर्वी त्याचे नाव कुणीही ऐकलेले नाही. तरीही त्यांना राम मंदिर ट्रस्टचे सर्वेसर्वा करण्यात आले.

केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी गोहत्या बंदी लागू केली नाही त्यावरून सुद्धा शंकराचार्य यांनी मोदी सरकारचे नाव न घेता निशाणा साधला. शंकराचार्य म्हणाले, गोहत्या बंदी लागू करण्यासाठी ज्यावेळी यांचे दोन खासदार होते तेव्हा हे लोक आग्रही होते. पण, जेव्हा खासदारांची संख्या 200 झाली तेव्हा गोहत्या बंदी विसरूनच गेले.

मंदिर निर्मितीसाठी जी रक्कम गोळा करण्यात आली त्यातून महागड्या किमतींवर जमीन खरेदी करण्यात येत आहे. अशात चंपत राय म्हणतात की आमच्यावर महात्मा गांधींच्या हत्येचे आरोप सुद्धा झाले आम्ही कसलीच परवा करत नाही हे म्हणणे बेजबाबदारपणाचे आहे. इतके बेजबाबदार लोक ट्रस्टवर बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना त्वरीत तेथून हटवावे असेही शंकराचार्य म्हणाले आहेत.

शुभ मुहूर्तावर झाला नाही कोनशिला कार्यक्रम
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी कोनशिला समारंभाच्या तिथीवर सुद्धा आक्षेप नोंदवला. मंदिराचे शिलान्यास अत्यंत अशुभ मुहूर्तावर करण्यात आले. आम्ही आधीच त्याचा विरोध केला होता, पण कुणी त्यावर लक्ष घातले नाही. त्यामुळेच आता बुद्धी भ्रष्ट होत आहे आणि त्याची उदाहरणे समोर येत आहेत.

असे आहे प्रकरण
अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून मंदिर निर्मितीसाठी जमीन खरेदी करण्यात आली. त्यावरच गंभीर आरोप करण्यात आले आहेत. समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री तेज नारायण पांडेय पवन यांनी ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, 2 कोटी रुपयांत घेतलेली जमीन 10 मिनिटांनंतर 18.50 कोटी रुपयांत विकण्यात आली आणि त्याची रेजिस्ट्री सुद्धा झाली. या प्रकरणात त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. याच प्रकरणात काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने सुद्धा सरकारवर निशाणा साधला आहे. पण, चंपत राय यांनी आपल्यावर लागलेले सर्व आरोप धुडकावून लावले आहेत.

बातम्या आणखी आहेत...