आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वतींचे निधन:ज्योतीर्मठ व शारदा पीठाचे होते शंकराचार्य, उद्या परमहंसी गंगा आश्रमात देणार समाधी

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतीर्मठ बद्रीनाथ व शारदा पीठ द्वारकाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचे रविवारी निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. त्यांनी मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील झोतेश्वर स्थित परमहंसी गंगा आश्रमात हृदयविकाराच्या सौम्य झटक्यानंतर दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. स्वरुपानंद सरस्वती यांना हिंदू धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू मानले जात होते.

शंकराचार्य प्रदिर्घ काळापासून आजारी होते. त्यांच्यावर बंगळुरुच्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथून ते नुकतेच आश्रमात परतले होते. शंकराचार्यांचे शिष्य ब्रह्म विद्यानंद यांनी सांगितले - 'स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांना सोमवारी सायंकाळी 5 वा. परमहंसी गंगा आश्रमात समाधी दिली जाईल.' स्वामी शंकराचार्य स्वातंत्र्य युद्धात तुरुंगातही केले होते. त्यांनी राम मंदिरासाठी प्रदिर्घ कायदेशीर लढाही दिला होता.

नरसिंहपूर स्थित झोतेश्वर परमहंसी गंगा आश्रमात शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी अखेरचा श्वास घेतला. आश्रमातील त्यांच्या खोलीचे रुग्णालयात रुपांतर करण्यात आले होते.
नरसिंहपूर स्थित झोतेश्वर परमहंसी गंगा आश्रमात शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी अखेरचा श्वास घेतला. आश्रमातील त्यांच्या खोलीचे रुग्णालयात रुपांतर करण्यात आले होते.

9 व्या वर्षी घर सोडून धर्म यात्रेवर निघाले

स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचा जन्म मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील दिघोरी गावातील ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांचे आई-वडिलांनी त्यांचे नाव पोथीराम उपाध्याय ठेवले होते. त्यांनी वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी घराबाहेर पडून धर्म यात्रा सुरू केली. त्यानंतर ते उत्तर प्रदेशातील काशीला जाऊन ब्रह्मलीन श्री स्वामी करपात्री महाराज वेद-वेदांग, शास्त्रांचे शिक्षण घेतले.

19 व्या वर्षी स्वातंत्र्य चळवळीत उतरले

1942 च्या त्या काळात अवघ्या 19 व्या वर्षी ते क्रांतिकारी साधू म्हणून नावारुपास आले होते. त्यावेळी देशावर ब्रिटीशांचे राज्य होते. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्यामुळे त्यांनी वाराणसीत 9, तर मध्य प्रदेशाच्या तुरुंगात 6 महिन्यांचा तुरुंगवास भोगला. त्यांचा वाढदिवस गत 3 तारखेला साजरा करण्यात आला होता.

शंकराचार्य प्रदिर्घ काळापासून आजारी होते. त्यांच्यावर बंगळुरुत उपचार सुरु होते. ते नुकतेच आपल्या आश्रमात परतले होते.
शंकराचार्य प्रदिर्घ काळापासून आजारी होते. त्यांच्यावर बंगळुरुत उपचार सुरु होते. ते नुकतेच आपल्या आश्रमात परतले होते.

1981 मध्ये शंकराचार्य उपाधी मिळाली

स्वामी स्वरुपानंद 1950 मध्ये दंडी संन्यासी बनले. त्यांनी ज्योर्तिमठ पीठाचे ब्रह्मलीन शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्याकडून दण्ड -संन्यासाची दीक्षा घेतली. तेव्हापासून ते स्वामी स्वरुपानंद सरस्वती म्हणून ओळखले जाऊ लागले. 1981 मध्ये त्यांना शंकराचार्याची उपाधी मिळाली. ते स्वामी करपात्री महाराजांचा राजकीय पक्ष राम राज्य परिषदेचे अध्यक्षही होते.

शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी 9 व्या वर्षी घर सोडन धर्म यात्रेची सुरूवात केली. त्यांनी काशीत ब्रह्मलीन स्वामी करपात्री महाराजांकडून वेद-वेदांग व शास्त्रांचे धडे घेतले.
शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी 9 व्या वर्षी घर सोडन धर्म यात्रेची सुरूवात केली. त्यांनी काशीत ब्रह्मलीन स्वामी करपात्री महाराजांकडून वेद-वेदांग व शास्त्रांचे धडे घेतले.

भाजपवर राम मंदिराच्या नावाने कार्यालय थाटण्याचा आरोप केला

शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वतींनी राम जन्मभूमी न्यासाच्या मुद्यावरून विहिंप व भाजपवर टीका केली होती. ते म्हणाले होते -'अयोध्येतील मंदिराच्या नावाने भाजप-विहिंप आपले कार्यालय थाटण्याच्या प्रयत्नांत आहेत. हे आम्हाला मान्य नाही. हिंदूंमध्ये शंकराचार्य सर्वोच्च असतात. हिंदूंचे सर्वोच्च न्यायालय आम्हीच आहोत. मंदिराचे एक धार्मिक स्वरुप असले पाहिजे. पण हे लोक त्याला राजकीय रुप देण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही हे खपवून घेणार नाही.'

अपडेट्स...

  • मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट केले -शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती सनातन धर्माचे ताकदवान पुरुष व संन्यासी परंपरेचे सूर्य होते.
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या निधनामुळे संत समाजाचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
  • काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या - शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी धर्म, अध्यात्म व परमार्थासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते.
बातम्या आणखी आहेत...