आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'घाबरलेले लोभी लोक आज स्वतःच्या फायद्यासाठी हुकूमशाही सत्तेचे गुणगान करत आहेत. देशाच्या जनतेची लढाई राहुल गांधी एकटेच लढत आहेत. भांडवलदार चोरांशी व चोरांना संरक्षण देणाऱ्या चौकीदारांशीही', अशा शब्दांत काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शरद पवार व उद्योगपी गौतम अदानी यांचा एक फोटोही शेअर केला आहे.
त्यांच्या या विधानावर भाजपने ही काँग्रेसची भूमिका आहे का असा प्रश्न केला असता, अलका लांबांनी स्पष्टीकरण दिले. त्यांच्या विधानावर भाजप, NCP व स्वतः अलका काय म्हणाल्या? वाचा...
अलका लांबांनी ही पोस्ट का केली?
अदानी - हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी विरोधकांनी केंद्राकडे संयुक्त संसदीय समितीची (JPC) मागणी केली आहे. या प्रकरणी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीव्र गदारोळ झाला. त्यानंतर 2 दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी जेपीसीची मागणी चूक असल्याचे नमूद करत यासाठी सुप्रीम कोर्टाची चौकशी समितीच पुरेशी असल्याचे स्पष्ट केले.
शरद पवार म्हणाले होते की, सर्वच विरोधी पक्ष JPC ची मागणी करत आहेत हे करे आहे. आमच्या पक्षाचाही यात समावेश आहे, हे ही खरे आहे. पण जेपीसीमध्ये 21 सदस्य असतील. त्यातील 15 जण सत्ताधारी पक्षाचे, तर उर्वरित 5-6 सदस्य विरोधकांचे असतील. असे असेल तर काय सत्य उजेडात येईल. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने समिती स्थापन करण्याचा दिलेला दुसरा पर्याय योग्य असल्याचे मला वाटते.
अलका लांबा काय म्हणाल्या?
पवारांच्या या विधानानंतर अलका लांबा यांनी सोशल मीडियावर शरद पवार व गौतम अदानींचा एक फोटो शेअर केला. त्यात त्या म्हणाल्या, 'घाबरलेले लोक लोभी लोक आज आपल्या फायद्यासाठी हुकूमशहाच्या सत्तेचे गुणगान करत आहेत. देशातील जनतेची लढाई एकटे राहुल गांधी लढत आहेत. भांडवलदार चोरांशी व चोरांना वाचवणाऱ्या चौकीदाराशीही.'
भाजपने विचारले - ही काँग्रेसची भूमिका आहे का?
अलका यांच्या या विधानानंतर भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी त्यांना हे काँग्रेसचे अधिकृत निवेदन आहे का? अशी विचारणा केली. ते म्हणाले - अलका लांबा यांनी शरद पवार यांच्यावर अविश्वसनीय हल्ला केला. त्या त्यांना लोभी व घाबरट म्हणाल्या. एक महाराष्ट्रीयन असल्याच्या नात्याने मी या घटनेमुळे थक्क झालो आहे.
अलका लांबा यांची स्पष्टोक्ती
अलका लांबा यांनी भाजप प्रवक्ते शहदाज पूनावाला यांच्या प्रश्नाला स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या - शरद पवारांविषयी त्यांचे विधान काँग्रेसची अधिकृत भूमिका नाही. अधिकृत भूमिका पक्षाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जारी केली जाते. अलका म्हणाल्या - 'मी एक काँग्रेस कायकर्ती आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांची जबाबदारीही माझी आहे. पक्षात लोकशाही आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.'
अजित पवारांनीही केली होती मोदींची प्रशंसा
शरद पवार यांच्या विधानंतर त्यांचे पुतणे अजित पवार यांनीही मोदी सरकारचे कौतुक केले आहे. त्यांनी भाजपचे विजय ईव्हीएममुळे नव्हे तर मोदींमुळे होत असल्याचे स्पष्ट केले. माझा ईव्हीएमवर पूर्ण विश्वास आहे. ईव्हीएममध्ये दोष असता तर छत्तीसगड, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश आदी राज्यांत विरोधी पक्षांचे सरकार आलेच नसते, असे ते म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.