आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिक्रिया:धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरुपाचे, पक्ष म्हणून गांभीर्याने विचारा करावा लागेल- शरद पवार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवाब मलिकांवर वैयक्तिक आरोप नाहीत- पवार

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर लागलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राज्यातील राजकारण धवळून निघाले आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या खासगी आयुष्याविषयी स्पष्टीकरण दिल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर भाष्य केले आहे. मुंडेंवरील बलात्काराचे आरोप हे गंभीर आहेत. एक पक्ष म्हणून याचा गांभीर्याने विचार करावा लागेल, असे पवार म्हणाले.

गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, 'धनंजय मुंडे बुधवारी मला भेटले होते. मुंडेंनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला सविस्तर माहिती दिली. त्यानुसार धनंजय मुंडेंचे काही व्यक्तींशी संबंध होते. त्यावरुन मुंडे यांच्याविरोधात काही तक्रारी करण्यात आल्या. हे प्रकरण या दिशेने जाईल, याची कल्पना धनंजय मुंडे यांना होती. त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि आदेश प्राप्त करुन घेतला होता. त्यामुळे आता याप्रकरणात फारसे बोलण्यासारखे काहीही नाही, असे शरद पवार यांनी सांगितले', असे पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले की, 'धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. एक पक्ष म्हणून या सगळ्याचा आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. पक्षातील प्रमुख सहकाऱ्यांशी बोलणे झाल्यावर, त्यांना विश्वासात घेऊन मुंडेंनी मला दिलेली माहिती त्यांच्यापुढे मांडणार आहे. त्यानंतर आम्ही धनंजय मुंडे यांच्याबाबत निर्णय घेऊ', असे पवार म्हणाले.

नवाब मलिकांवर वैयक्तिक आरोप नाहीत- पवार

विशष म्हणजे, शरद पवारांनी धनंजय मुंडेंबाबत रोखठोक मत मांडले असले, तरी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची पाठराखण केली आहे. 'नवाब मलिक हे राज्यातील महत्त्वाच्या मंत्र्यांपैकी एक आहेत. 25 वर्षांहून अधिक काळ ते विधिमंडळात आहेत. या काळात त्यांच्यावर एकदाही कोणतेही वैयक्तिक स्वरुपाचे आरोप झालेले नाहीत. त्यांच्या नातेवाईकावर आरोप झाले आहेत. त्या नातेवाईकाला संबंधित यंत्रणेने अटक केली आहे. आता एनसीबीने वस्तुस्थिती समोर आणणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले.

बातम्या आणखी आहेत...