आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sharad Pawar Lakhimpur| Sharad Pawar Compares Lakhimpur Attack With Jalianwala Baug Incident Demands Supreme Court Enquiry

लखीमपूर हल्ला प्रकरण:लखीमपूरची घटना जालियानला बाग हत्याकांडसारखी, सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी चौकशी करावी; शरद पवारांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेची तुलना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालियानवाला बाग हत्याकांडाशी केली आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन पवारांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. हा शेतकऱ्यांवर थेट हल्ला आहे. या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी त्याची सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या मार्फत चौकशी करायला हवी अशी मागणी पवारांनी यावेळी बोलताना केली.

पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, "शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. दूध का दूध, पाणी का पाणी करण्यासाठी या घटनेची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी करावी. सत्य समोर आले पाहिजे. हातात आलेल्या सत्तेचा हा दुरुपयोग असून मी त्याचा तीव्र निषेध करतो. मी शेतकऱ्यांना आश्वस्त करू इच्छितो की ते एकटे नाहीत. हा हल्ला तुमच्या विरोधात झाला असेल, सत्तेचा वापर तुमच्याविरोधात होत असेल, पण देशभरातील विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत."

केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये संवेदना नाहीत. जी परिस्थिती जालियानवाला बाग येथे घडली होती तीच उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथे घडली आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी शांततापूर्वक आंदोलन केले. त्यांच्यावर 26 जानेवारी रोजी हल्ला करण्यात आला. त्याच्या प्रतिक्रिया देशभर उमटल्या होत्या. लोकशाहीमध्ये शांततेने आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. लखीमपूर येथे जमलेले शेतकरी शांततापूर्वक आंदोलन करत होते. त्यांच्या अंगावर गाडी चढवण्यात आली. त्यात काहींचा मृत्यू झाला. हिंसाचारामध्ये ज्यांचे जीव गेले त्या सर्वांसाठी भाजप शासित दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकार जबाबदार आहे. असेही शरद पवार म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...