आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज नकलाकार, अजित पवारांचा हल्ला:म्हणाले- शरद पवार सत्तेसाठी हपापलेले नेते नाहीत, राज ठाकरेंचे जेवढे वय तेवढे पवारांचे कार्य

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्तेसाठी शरद पवार कधीच हपापलेले नव्हते. जे आज पवारांवर टीका करीत आहेत त्यांनी साखर कारखाना कधी काढला नाही, ना कधी सोसायटीही अशांना खरबूज सोसायटीही माहीत नाही. राज ठाकरे यांचे जेवढे वय, तेवढा शरद पवारांचा राजकीय अनुभव आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंवर प्रखर टीका केली.

नाशिक येथे एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. राज ठाकरेंवर कडाडून हल्ला चढवताना अजित पवार म्हणाले की, या पठ्ठ्याने एकही सोसायची काढली नाही. राज ठाकरे योगींची स्तुती करतात, योगींनी असे केले तसे केले सांगत सुटतात पण योगींनी केवळ मशिदीवरील भोंगेच बंद केले नाही तर मंदीरावरील भोंगेही बंद केले याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

माणसांचे संसार उभे करायला अक्कल लागते

अजित पवार म्हणाले की, डिझेल-पेट्रोलबद्दल राज बोलले नाही. महागाई आणि सामान्य माणसांच्या जगण्यासंदर्भात काहीही सांगतिले नाही, सामान्य माणसांचा ते विचार करीत नाही पण ते मोडतोडीची भाषा करतात. माणसांचे संसार उभे करायला अक्कल लागते, मोडतोड करायला नाही अशा शब्दात त्यांनी हल्ला चढविला.

राजसारखे लोक समाजात दरी पाडीत आहेत

राजकीय स्वार्थापोटी ही मंडळी समाजात दरी पाडण्याचे काम राज ठाकरेंसारखे लोक करीत आहेत. छत्रपती शिवरायांचा वापर राजकीय दुकानदारीसाठी केला. शरद पवारांवर राज टीका करतात की, शिवरायांचे नाव ते घेत नाही पण पवार फक्त नावच घेत नाही तर त्यांच्या विचारावर चालण्याचे काम शरद पवार करीत आहेत असे सांगत राज यांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला.

उचलली जीभ लावली टाळ्याला

राज यांना बोलायला काय जाते उचलली जीभ लावली टाळ्याला असे म्हणत राज भाषणात नकला करतात ते भाषण करायला येतात की, नकलाकार आहेत. काही चुकले तरी आम्ही माफी मागतो असेही ते म्हणाले.

​​आमच्या नसानसांत शिवराय

​​आमच्या नसानसांत शिवराय असून कोण तुकडोजीराव आम्हाला शिवरायांबद्दल सुनावतो. राज्यात हल्ली वातावरण बिघडवण्याचे काम केले जात आहे. राज्याची परिस्थिती पाहून गुंतवणूकीसाठी उद्योग येतात याचे भान ठेवा असेही अजित पवार म्हणाले. यांची सभा संध्याकाळी असते त्यांनी कधीच कष्ट केले नाही असेही ते म्हणाले.

राज यांच्या वयाएवढा पवारांचा अनुभव

राज नकलाकार आहे असा घणाघात करीत त्यांनी राज ठाकरेंचे जेवढे वय तेवढा शरद पवारांचा अनुभव आहे. उगाच लोकांच्या भावना राज ठाकरेंनी भडकवू नये अशा शब्दात राज यांना अजित पवारांनी फटकारले. राज्यात वातावरण चांगले आहे राज ठाकरेंसारखे लोक वातावरण बिघडवत आहेत.

शिवाजी महाराज अंधश्रद्धाळू कधीही नव्हते

विविध जाती-धर्माच्या लोकांचा आदर करा, कोणत्याही धार्मिकस्थळी माथा टेकवायला हवा उगाच लोकांना भडकावण्याचे काम करु नये. जातीय सलोखा राज्यात ठेवावाच लागेल. सर्वांशी आपलेपणाने वागावेच लागेल ही खूणगाठ मनाशी कायम ठेवा असेही अजित पवार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...