आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sharad Pawar Will Meet Rajnath Singh Sonia, Pawar And Mulayam For The Post Of President

राष्ट्रपतिपदासाठी शरद पवार अनुत्सुक:सर्वसंमतीसाठी राजनाथसिंह सोनिया, पवार, मुलायम यांना भेटणार

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सर्वसंमतीचा उमेदवार ठरवण्याचा प्रयत्न म्हणून संरक्षणमंत्री राजनाथसिंह विविध नेत्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतील. देशातील सर्वोच्च घटनात्मक पदासाठी बहुतांश पक्षांना मान्य असलेला उमेदवार निश्चित करावा, अशी भाजपची इच्छा आहे. त्यासाठी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह विविध नेत्यांशी चर्चा करतील. दरम्यान, विरोधी पक्षांची राष्ट्रपतिपदाची उमेदवारी शरद पवार यांनी नाकारली आहे. १८ जुलै रोजी राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होत आहे.

मंगळवारी ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चेनंतर पवार यांनी स्वत: येचुरी, डी. राजा आणि पी. सी. चाकाे यांची भेट घेतली. सीताराम येचुरी म्हणाले की, पवारांनी उमेदवारी नाकारली आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनीच विरोधी उमेदवार म्हणून पवार यांचे नाव पुढे केले होते.

ममतांनी बोलावली आज बैठक
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांची संयुक्त रणनीती ठरवण्यासाठी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी २२ पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत डावे पक्षही सहभागी होतील, असे माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...