आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Sharad Pawar's Want To Hold A Meeting In West Bengal; Phone Conversation With Mamata

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोलकाता:पश्चिम बंगालमध्ये सभा घेण्याची शरद पवार यांची इच्छा; ममतांशी दूरध्वनीवर चर्चा

कोलकाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. यादरम्यान इतर अनेक विरोधी नेत्यांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे.

तृणमूलच्या सूत्रांनी सोमवारी सांगितले की, भाजपविरोधी एक आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नांतर्गत कोलकात्यात विरोधी नेत्यांची एक मोठी सभा आयोजित करण्याचा आमच्या पक्षाचा विचार आहे. एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, ‘दूरध्वनीवरील चर्चेत शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांना आपला पाठिंबा जाहीर केला. पवार यांनी बंगालमध्ये येण्याची आणि तृणमूलच्या समर्थनार्थ प्रचार करण्याची इच्छाही व्यक्त केली.’

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser