आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Share Market | Mumbai | Latest News Share Market | Marathi News | The Market Collapsed 3%; The Biggest Drop In Ten And A Half Months

जागतिक कारणांमुळे भारतीय बाजार कोसळले:बाजार 3% कोसळले; साडेदहा महिन्यांतील सर्वात मोठी घसरण

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्रूड तसेच रशिया-युक्रेन युद्धाच्या शंकेने जागतिक बाजार धास्तावले
  • ​​​​​​​गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे मूल्य 8.47 लाख कोटींनी घटले

भारतीय शेअर बाजारांत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विक्रीचा मारा झाला. यामुळे सेन्सेक्स व निफ्टी ३% कोसळले. यापूर्वी ४ एप्रिल २०२१ ला ३% पेक्षा जास्त घसरण झाली होती. बाजारात ताज्या घसरणीमागे महागडे क्रूड ऑइल, दरवाढीवरून अमेरिकी फेड रिझर्व्हची बैठक आणि रशिया-युक्रेन युद्धाची शंका ही ३ प्रमुख कारणे आहेत. सोमवारी सेन्सेक्समध्ये १,७४७, तर निफ्टीत ५३२ अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समधील प्रमुख ३० कंपन्यांपैकी फक्त टीसीएसमध्ये तेजी होती, इतर सर्व २९ कंपन्यांच्या शेअर्समध्ये काही महिन्यांतील सर्वात मोठी घसरण झाली. यामुळे बीएसईत गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे मूल्य ८.४७ लाख कोटी रुपयांनी (३.२१%) घटले.

गेल्या दोन दिवसांतील पडझडीत सेन्सेक्समध्ये २,५२०.१९ (४.२८%) तर निफ्टीत ७६३.०५ अंकांची (४.३३%) घसरण झाली आहे. या दरम्यान बीएसईत गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे मूल्य १२.३९ लाख कोटी रुपयांनी (४.६३%) घटले आहे. बीएसईत नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप २५५.४२ लाख कोटी रुपयांवर आले आहे. ते गेल्या शुक्रवारी २६३.८९ लाख कोटी रुपये तर गुरुवारी २६७.८१ लाख कोटी रुपये इतके होते. सोमवारी सर्वाधिक ५% घसरण रिअॅलिटी आणि धातू क्षेत्रात झाली. सर्वात कमी १% घसरण टेक, ऊर्जा आणि आयटी क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये नोंदवण्यात आली.

महाराष्ट्राच्या गुंतवणूकदारांना ३ लाख कोटी रु. पेक्षा जास्त फटका

भारतीय शेअर बाजारात महाराष्ट्र-मुंबईची हिस्सेदारी ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत आहे. ते विचारात घेता सोमवारी शेअर बाजार कोसळल्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबईतील गुंतवणूकदारांचे सुमारे ३ लाख कोटी रुपयांपेक्षा मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र आणि मुंबईनंतर शेअर बाजारात दिल्लीतील गुंतवणूकदारांचा १२ ते-१४ टक्क्यांपर्यंत वाटा आहे. गुजरात १२ ते १३%, तर राजस्थानातील गुंतवणूकदारांचा ८-१०% हिस्सा आहे.

बाजार पडताच सोने झळाळले, पुन्हा दर ५१ हजार रुपयांपार
भारतीय शेअर बाजारात झालेली तीन टक्क्यांची घसरण आणि रशिया-युक्रेन या देशादरम्यानच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या दराने पुन्हा उसळी घेतली आहे. सोमवाारी सोन्याच्या दराने प्रतितोळा ५१ हजारांचा टप्पा गाठला. जळगाव सोने बाजारात ४०० रुपयांची वाढ होऊन प्रति तोळा ५१,३०० ते ५१,४०० रुपये झाले. तर चांदी प्रति किलाेचे दर ६५,५०० रुपयांपर्यंत पाेहाेचले आहेत.

पडझडीमागील प्रमुख कारणे
रशिया-युक्रेन : दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटू शकते. यामुळे शुक्रवारी अमेरिका आणि युरोपमधील शेअर बाजार कोसळले. सोमवारी त्याचा परिणाम आशियात दिसून आला.
अमेरिकेत विक्रमी महागाई : दर ७.५% आहे. ही ४० वर्षांतील उच्चांकी पातळी आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदरांत वाढ करत आहे.
महागडे क्रूड : सोमवारी ब्रेंट क्रूडचे दर ९६.१६ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले. ही ऑक्टोबर २०१४ नंतरची सर्वाेच्च पातळी आहे. यामुळे महागाई वाढेल.

परकीय गुंतवणूकदारांचा काढता पाय : जागतिक चिंतांमुळे परकीय गुंतवणूकदार भारतातील हिस्सेदारी घटवत आहेत. ऑक्टोबरपासून त्यांनी ८३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्री केली आहे.

सेन्सेक्स
14 फेब्रुवारीला उघडला
56,405.84
14 फेब्रुवारीला बंद
58,152.92
11 फेब्रुवारीला बंद

यापुढेही चढ-उतार होण्याची शक्यता
बाजारात काही आठवडे चढ-उतार कायम राहू शकतो. परकीय गुंतवणूकदारांनी जास्त विक्री केली तर मोठी घसरण होऊ शकते. अशा वेळी गुंतवणूक करताना शेअर्सच्या दरांवर लक्ष दिले पाहिजे. सध्या कमी दर अन् चांगल्या व्यावसायिक शक्यता असलेल्या कंपनीत गुंतवणूक करावी. पोर्टफोलिओत इक्विटी विभाजनावरही लक्ष द्यावे. त्यात इक्विटीचा भाग अल्प असेल तर या पडझडीत खरेदी केली पाहिजे.’ - एस. रंगनाथन, रिसर्च हेड, एलकेपी, सिक्युरिटीज

बातम्या आणखी आहेत...