आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी विरोधकांच्या एकजुटीची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की जर ते पक्ष नेतृत्वात सहभागी असते तर छोट्या पक्षांना पुढे आणले असते, जेणेकरून भाजपला हरवता येईल.
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना थरूर म्हणाले की लोकसभेतून राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर विरोधकांत ऐक्याची लाट आली आहे. ही लाट आश्चर्यकारक आहे. विरोधकांना समजू लागले आहे की ऐक्य मजबूत बनवते आणि फूट आपल्याला कमजोर करते.
विरोधक एकत्र आल्यास भाजपला बहुमत मिळू शकणार नाही
थरूर म्हणाले की, 2024 मध्ये बहुतांश विरोधक एकत्र आले तर एकमेकांच्या मतांचे विभाजन झाले नाही तर भाजपसाठी ही वाइट बातमी असू शकते. या फॉर्म्युलामुळे 2024 मध्ये बहुमत मिळवणे भाजपसाठी कठीण होईल. भाजपने 2019 च्या निवडणुकीत केवळ 37 टक्के मतांसह लोकसभेच्या 60 टक्क्यांहून जास्त जागा मिळवल्या. उर्वरित 35 टक्के मते विरोधी पक्षांना मिळाली.
राहुल हे भाजपसाठी धोका
शशी थरूर यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा उल्लेख करताना म्हटले की भाजप या यात्रेमुळे घाबरली आहे. अनेक वर्षांपर्यंत भाजपने राहुल गांधींची थट्टा करण्याचा प्रयत्न केला, मात्र आता त्यांना जाणीव झाली आहे की ते त्यांच्यासाठी एक मोठा धोका आहे.
200 जागांवर भाजप-काँग्रेस थेट मुकाबला
जेव्हा त्यांना विचारले गेले की, 2024 मध्ये भाजपचा सामना करण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेस आधार ठरू शकते का. यावर थरूर म्हणाले की निष्पक्षपणे आम्ही राष्ट्रीय व्यापकता असलेला एकमेव विरोधी पक्ष आहोत. सुमारे 200 जागा अशा आहेत जिथे थेट भाजप आणि काँग्रेसमध्ये सामना आहे.
राहुल गांधींच्या अपात्रतेकडे 1970 च्या दशकातील माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या अपात्रतेसारखे बघता का असे विचारल्यावर थरूर म्हणाले की, यात कसलिही शंका नाही की निंदनीय अपात्रता आणि तुरुंगवासाच्या शिक्षेनंतर जनतेची सहानुभूती राहुल गांधींसोबत आहे. ते म्हणाले की, लोकांना वाटते की हे लोकशाहीसाठी योग्य नाही की प्रमुख विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याला तुरुगंवासाची शिक्षा दिली जाते आणि संसदेत बोलू दिले जात नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.