आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर खासदार शशी थरूर काँग्रेसला फारकत देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा आहे. पण आता थरूर यांनीच हे वृत्त फेटाळले आहे.
एनआयएच्या वृत्तानुसार, राष्ट्रवादीचे केरळ प्रदेशाध्यक्ष पी सी चाको यांनी सोमवारी शशी थरूर यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले. थरूर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, तर त्याचे जोरदार स्वागत केले जाईल. काँग्रेसने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला तरी ते तिरुवनंतपुरमचे खासदार राहतील. काँग्रेस त्यांच्याकडे दुर्लक्ष का करत आहे हे मला समजत नाही, असे ते म्हणाले होते.
थरूर म्हणाले मी NCPत जाणार नाही
थरूर यांनी पी सी चाको यांचे विधान फेटाळून लावत आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले -मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार नाही. मी तिथे जात असेल तर निश्चितच माझे स्वागत झाले पाहिजे. पण तूर्त माझा राष्ट्रवादीत जाण्याचा विचार नाही. पी सी चाको यांच्याशीही या प्रकरणी कोणतीही चर्चा झाली नाही.
थरूर यांच्यावर गटबाजीचा आरोप
शशी थरूर काही दिवसांपूर्वी केरळच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी मलप्पुरममधील काँग्रेस आघाडीचा (यूडीएफ) प्रमुख सहकारी पक्ष इंडियन यूनियन मुस्लिम लीगच्या (IUML) नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर थरूर पक्षात आपला नवा गट तयार करत असल्याची चर्चा रंगली होती. थरूर यांनी या चर्चेला पूर्णविराम दे्याचा प्रयत्न करत कुणीही आपली भीती बाळगण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले होते.
या प्रकरणी विरोधी पक्षनेते तथा केरळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही डी सतीशन यांनी थरूर यांना स्पष्ट शब्दांत ताकिद दिली होती. ते म्हणाले होते - राज्यात कोणत्याही नेत्याला समांतर कारवाया करण्याची परवानगी नाही. कुणी असे करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा कठोरपणे निपटारा केला जाईल.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर थरूर नाराज
यासंबंधीच्या वृत्तानुसार, काँग्रेसमधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर शशी थरूर यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे. मल्लिकार्जुन खरगे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर थरूर यांना मोठ्या जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवले जात आहे. यामुळे थरूर नाराज झालेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी थरूर यांनी उमेदवारी भरली. पण त्यांचा दारून पराभव झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.