आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Shashi Tharoor Sorry Update; Narendra Modi Bangladesh News | Congress MP Shashi Tharoor Says Sorry For PM Narendra Modi Bangladesh Speech

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शशी थरुर यांनी मागतली माफी:'बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले योगदान' यावरुन मोदीवर केली होती जोरदार टीका; घाईघाईत पोस्ट शेअर केल्याचा दावा

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान मोदी हे काल बांगलादेशाच्या स्वातंत्र समारोहासाठी दोन दिवसाच्या दौऱ्यावर गेले आहे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बांग्लादेशाच्या स्वातंत्र आंदोलनात आपले योगदान असल्याचे म्हटले होते. यावरुन त्यांच्यावर प्रचंड टिकेची झोड उठली होती. यामध्ये काँग्रेसचे नेता शशी थरुर यांनीदेखील पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टिका केली होती. परंतु, आता शशी थरुर यांनी काल केलेच्या ट्वीटवर दिलगिरी व्यक्त करत माफी मागतली आहे.

पंतप्रधान मोदी हे काल बांगलादेशाच्या स्वातंत्र समारोहासाठी दोन दिवसाच्या दौऱ्यावर गेले आहे. ज्यामध्ये शुक्रवार संध्याकाळी ते स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त व बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ढाका येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. त्यामध्ये केलेल्या विधानावरुन मोदी यांच्यावर टिकेची झोड उठली होती.

शशी थरुर यांनी अशी केली होती टिका
काँग्रेस नेता शशी थरुर यांनी आपल्या सोशल मीडियावर हँडलवरुन 'प्रत्येक व्यक्तींना माहित आहे की, बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यासाठी कोणाचा योगदान आहे, मोदी यांनी इंदिरा गांधी यांचे योगदान सांगितले नाही' परंतु, स्वत:चे योगदानाचे मात्र वर्णन केले.' अशी पोस्ट शेअर केली होती.

बातम्या आणखी आहेत...