आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिनेसृष्टीच्या मैदानातून राजकारणाच्या आखाड्यात उतरलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकताच काँग्रेसचा हात सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना तृणमूलमध्ये नेण्यात निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर व माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांची महत्वाची भूमिका होती. काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी यावर आता नव्हे तर नंतर बोलणार असल्याचे स्पष्ट केले.
भाजपसोबत राजकीय प्रवास सुरु करणारे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ममता बॅनर्जी यांच्या पक्षासोबत येणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. त्यांची खूप दिवसांपासून मला पक्षात सहभागी करवून घेण्याची इच्छा होती. मी तृणमूलमध्ये येवून आसनसोल लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी असे ट्विटही ममतांनी केले होते.
आसनसोलमधून लढवणार निवडणूक
सिन्हा यांच्या प्रवेशानंतर तृणमूल काँग्रेसने लगेचच लोकसभा व विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तृणमूलने आसनसोल लोकसभा मतदार संघातून शत्रुघ्न सिन्हा यांना मैदानात उतरवले आहे. तर बालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीत बाबूल सुप्रियो यांना उमेदवारी दिली आहे.
आसनसोलची जागा बाबूल सुप्रियो यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली होती. सुप्रियो भाजप सोडून तृणमूलमध्ये आले होते. ते भाजपच्या तिकिटावर सलग 2 वेळा आसनसोलमधून निवडून आले होते. आसनसोल हे पश्चिम बंगालमधील दुसरे सर्वात मोठे शहर असल्यामुळे येथील निवडणुकीवर सर्वांची नजर आहे.
2019 मध्ये भाजपला सोडचिठ्ठी दिली
शत्रुघ्न सिन्हा यांनी 1991 मध्ये भाजपत प्रवेश केला होता. पक्षाने त्यांना अनेक महत्वाची पदे दिली. ते राज्यसभा सदस्य व केंद्रीय मंत्रीही राहिले. पाटणा साहिब मतदार संघातून ते लोकसभेवरही पोहोचले. पण, 2014 मध्ये त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या व भाजपच्या संबंधांत वितुष्ट निर्मामण झाले.
भाजपने 2019 मध्ये पाटणा साहिबमधून त्यांच्या जागी रवीशंकर प्रासद यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा सिन्हा यांनी काँग्रेसचा हात पकडला. ते भाजपत जवळपास 28 वर्षे राहिले. त्यानंतर काँग्रेससोबत त्यांनी जवळपास 3 वर्षे प्रवास केला.
सिन्हा यांनी काँग्रेसच्या तिकिटावर पाटणा साहिब मतदार संघातून निवडणूक लढवली. पण, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते भाजपवर एवढे संतापले की, त्यांनी बांकीपूर मतदार संघातील भाजप उमेदवार नितीन नवीन यांच्याविरोधात आपले पुत्र लव सिन्हा यांना काँग्रेसच्या बाजूने मैदानात उतरवले. पण, त्यांच्या मुलाचा पराभव झाला. शत्रुघ्न यांच्या पत्नी पूनम यांचाही लखनौ मतदार संघात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या विरोधात पराभव झाला.
बिहारी बाबूंचा राजकीय सफरनामा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.