आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीव्ही तथा छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. तिच्या आत्महत्येची चर्चा आता फिल्म इंडस्ट्रीसह छोट्या पडद्यावरील सृष्टीतदेखील होत आहे.
कारण, अभिनेत्री तुनिषाच्या आईने तुनिषाच्या को-अॅक्टर शिझान मोहम्मद खानवर अनेक गंभीर आरोप केले. तर आईने केलेल्या आरोपात मुलीच्या मृत्यूस शिझानच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी शिझान खानला अटक केली आहे.
याप्रकरणात संशयित असलेला शिझान खान नेमका कोण आहे. त्याची आणि तुनिषा शर्माची ओळख कशी झाली होती, यासह अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जाणून घेऊया शिझानबद्दल..
टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेता
पोलिसांनी केली शिझान मोहम्मद खानला अटक
विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुनिषा शर्माच्या आईने शीझान मोहम्मद खानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तुनिषाच्या आईचा असा विश्वास आहे की, तिची मुलगी आणि शिझान मोहम्मद खान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगले संबंध नव्हते. ज्यामुळे तुनिषा बऱ्याच दिवसांपासून त्रस्त होती. तुनिषा डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यानंतर डॉक्टरांनी तुनिषाच्या आईला सांगितले की, तुनिषाला आत्महत्येचे विचार येत आहेत. अशा परिस्थितीत शिझानला कंटाळून तिने शनिवारी आत्महत्या केली. तुनिषाच्या आईच्या आरोपानंतर पोलिसांनी शिझान खानला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे.
यासंबंधीच्या आणखी बातम्या वाचा...
तुनिषाने अभिनेत्याच्या मेकअप रूममध्ये का केली आत्महत्या?:20 वर्षीय अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर 5 प्रश्न अनुत्तरित
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्री तिच्या को-स्टारच्या मेकअप रूममध्ये मृतावस्थेत आढळून आली. तुनिषाच्या मृत्यूने अनेक प्रश्न उभे झाले आहेत, ज्यांची उत्तरे केवळ तिचे कुटुंबीय किंवा मित्रच नव्हे तर सर्वसामान्यांनाही जाणून घ्यायची आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अभिनेत्री तुनिषाच्या पोस्टमार्टमची व्हिडिओग्राफी:दुपारी 4 वाजता होणार अंत्यसंस्कार, को-स्टार शीजान खानला अटक
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माचे रविवारी सकाळी मुंबईतील जेजे रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्याची व्हिडिओग्राफीही करण्यात आली आहे. सकाळी अकराच्या सुमारास तुनिषाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार आहे. तुनिषाचा मृतदेह रुग्णालयातून मीरा रोडवर आणण्यात येणार असून दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तुनिषाने शनिवारी शूटिंग सेटवर गळफास लावून आत्महत्या केली होती. येथे वाचा संपूर्ण बातमी
टीव्ही अभिनेत्रीची मालिकेच्या सेटवर आत्महत्या:20 वर्षीय तुनिषा शर्मा कतरिनाच्या फितूर चित्रपटातही झळकली होती
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी मुंबईत शूटिंगच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. 20 वर्षीय तुनिषा एक म्युझिक व्हिडिओ शूट करणार होती. सेटवरील लोकांनी तिला फासावर लटकलेले पाहून खाली उतरवले आणि हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आत्महत्येपर्यंत टुनिशा पूर्णपणे सामान्य होती आणि 5 तासांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर तिचा फोटो आणि काही नोट्स शेअर केल्या होत्या. येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.