आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार:जनता दल राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार श्रीनारायण सिंह यांची प्रचारादरम्यान गोळ्या झाडून हत्या

पटनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवहर मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्याहे श्रीनारायण सिंह यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. श्रीनारायण सिंह जनता दल राष्ट्रवादी पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढवत होते. श्रीनारायण सिंह यांना आरोपींनी प्रचारादरम्यान गोळी मारली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनारायण पुरनहिया परिसरातील हथसारमध्ये प्रचार करत होते. यादरम्यान कार्यकर्ते बनून गर्दीत घुसलेल्या बाईकस्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. सीतामडी हॉस्पीटलमध्ये नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

श्रीनारायण यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी

श्रीनारायण सिंहवर 6 गुन्हे दाखल आहेत. अवैध हत्यार ठेवल्याप्रकरणी त्यांना दोन वर्षांची शिक्षाही झाली आहे. ते शिवहरच्या नयागावचे रहिवासी होते आणि नयागावचे सरपंच आणि डुमरी कटसरीवरुन जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत.

तिकीट न मिळाल्यामुळे राजद सोडला

श्रीनारायण राजदचे जिला उपाध्यक्ष होते. यावेळेस त्यांना शिवहरवरुन पक्षाने तिकीट दिले नाही. यामुळे नाराज झालेल्या श्रीनारायण सिंहने राजद सोडून जनता दल राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली.