आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात सीमावादावरून शाब्दिक युद्ध सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची सोमवारी अहमदाबाद विमानतळावर समोरासमोर छोटीशी भेट झाली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या बैठकीचा तपशील विचारला असता त्यांनी या बैठकीचा इन्कार किंवा दुजोराही दिला नाही.
भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याहून परतताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस व कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. बोम्मई यांची अहमदाबाद विमानतळावर विशेष कक्षात भेट झाली. यात उभयतांत एकमेकांविरोधात वक्तव्ये न करण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत आक्रमक वक्तव्ये करून वातावरण बिघडू नये याची दक्षता घेण्यावरही चर्चा झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.